esakal | Good News - भावी शिक्षकांसाठी खुशखबर! आता वर्षातून दोनवेळा होणार 'TET'
sakal

बोलून बातमी शोधा

भावी शिक्षकांसाठी खुशखबर! आता वर्षातून दोनवेळा होणार 'TET'

सरकारकडून हिरवा कंदील मिळताच पाच हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे

भावी शिक्षकांसाठी खुशखबर! आता वर्षातून दोनवेळा होणार 'TET'

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : यापुढे शिक्षण खात्याने वर्षातून दोनदा टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. टीईटी पास होण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळताच पाच हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.

२०१४ पासून राज्यात शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. मात्र पहिल्या वर्षी पासूनच टीईटी परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या अतिशय कमी आहे. यावर्षी पहिल्यांदाच टीईटीच्या निकालात काही प्रमाणात वाढ झाली आहे. असे असले तरीही वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेऊन शिक्षक भरतीसाठी योग्य उमेदवारांची कमतरता पडू नये, याकडे लक्ष दिले जाणार आहे. शिक्षक भरती करण्यापूर्वी टीईटी परीक्षेत पास झालेल्या परीक्षार्थींना सीईटीला सामोरे जावे लागते. त्यानंतर सीईटीतील गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती केली जाते.

हेही वाचा: 'DCBI'ची धडक कारवाई; रायबागेत 10 किलोचे चंदन जप्त, एकजण अटकेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून कोणत्याही प्रकारच्या सरकारी कार्यात नवीन भरती करण्यास सरकारी ब्रेक लावला आहे. मात्र राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रिक्त शिक्षकांच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यावर्षी अनेक शिक्षक निवृत्त झाले आहेत. कोरोनामुळेही अनेक शिक्षकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने लवकर शिक्षक भरती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षण खात्याने लवकर शिक्षक भरती करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. शिक्षक भरती झाल्यास टीईटी परीक्षा पास झालेल्या परीक्षार्थीना चांगला लाभ होणार आहे.

"यावर्षी डीएड व बीएडधारकांनी मोठ्या प्रमाणात टीईटी दिली होती. परंतु पास होण्याचे प्रमाण कमी आहे. दोन वेळा टीईटी घेतल्यास पास होणाऱ्या परिक्षार्थींची संख्या वाढणार आहे."

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

हेही वाचा: बेळगाव - निवडणुक संपली; आता वेध अध्यक्ष निवडीची

loading image
go to top