TET Exam : शिक्षक भरतीसाठी 'या' महिन्यात टीईटी; राज्यात शिक्षकांच्या 10 हजार रिक्त जागांवर होणार भरती

राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी (Teacher Recruitment) जूनमध्ये महिन्यात टीईटी होणार आहे.
TET Exam Education Department Karnataka
TET Exam Education Department Karnatakaesakal
Summary

सिंधुत्व प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने काही पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही.

बेळगाव : राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी (Teacher Recruitment) जूनमध्ये महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची (TET Exam) तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून २०१४ पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे.

TET Exam Education Department Karnataka
Barti Center : 'बार्टी'च्या स्पर्धा परीक्षा केंद्रांना टाळे? घोषणा 365 कोटींच्या निधीची; मंजूर फक्त 75 कोटी रुपये

मात्र, टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थीना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. मात्र सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या दोन ते तीन टक्के असते. त्यामुळे शिक्षण खात्याने (Education Department) अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तर सीईटी परीक्षेत गुणवत्ता मिळविले परिक्षार्थी कमी असतात त्यामुळे अधिक प्रमाणात जागा असूनही शिक्षक भरती साठी मंजूर झालेला जागा रिक्त राहत आहेत.

त्यामुळे शिक्षण खात्याने १३५०० शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्व जागा भरती करण्यास अडचण येणार नाही असे मत व्यक्त होत आहे. गेल्या वर्षीपासून शिक्षण खात्याने राज्यात १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

TET Exam Education Department Karnataka
CTET Exam : ‘सीटीईटी’ परीक्षा ७ जुलैला होणार; परीक्षेसाठी २ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार

मात्र, सिंधुत्व प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने काही पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही त्यामुळे काही पात्र उमेदवारांची चिंता वाढली आहे. मात्र ज्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे त्या शिक्षकांना कोणतीही अडचण होणार नाही त्यामुळे अनेक शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी टीईटी आवश्‍यक

राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच दर वर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरवर्षी रिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत जात आहे. त्याचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या जागा भरती करणे गरजेचे बनले आहे. मात्र पाच ते सहा वर्षांतून एकदा शिक्षक भरती केली जात आहे. त्यामुळे अनेक शाळांची मोठी अडचण होत असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी टीईटी घेऊन अधिक प्रमाणात शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com