TET Exam : विद्यार्थ्यांनो, परीक्षेची तारीख ठरली; ऑनलाईल अर्ज करा दाखल!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

परीक्षेचे प्रवेशपत्र 4 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट काढून घेणे गरजेचे आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी 'शिक्षक पात्रता परीक्षा' (टीईटी) 19 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज शुक्रवार (ता.8)) पासून भरता येणार आहे.

राज्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शासकीय शाळांसह, अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत शाळांमध्ये शिक्षण म्हणून नोकरी मिळविण्यासाठी तसेच सर्व परीक्षा मंडळांमध्ये नियुक्तीसाठी 'टीईटी' पात्रता अनिवार्य आहे. पूर्वी डी.एड, बी.एड झालेल्या उमेदवारांना थेट शिक्षक म्हणून रुजू होता येत होते. मात्र, चुकीच्या पद्धतीने प्रवेश मिळवून हे अभ्यासक्रम पूर्ण केले जात होते. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

- राजीनामा दिल्यानंतरही फडणवीसच मुख्यमंत्री

त्यासाठी शासनाने 'टीईटी' परिक्षा देण्यास सुरूवात केली.
यावर्षीची ही परिक्षा 19 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. पहिला पेपर सकाळी साडे दहा ते दुपारी एक आणि दुसरा पेपर दुपारी दोन ते साडे चार यावेळत होणार आहे. या परीक्षेचे अर्ज, शासन निर्णय, नियम व अटी यासह सर्व माहिती 'https://mahatet.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

- खुशखबर: 'एसबीआय'कडून कर्जदरात कपात

28 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज व शुल्क भरता येणार आहे. तर परीक्षेचे प्रवेशपत्र 4 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट काढून घेणे गरजेचे आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. 

- मसुदा नको, मुख्यमंत्री पदावरच बोला- राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The TET exam will be held on 19 January 2020