esakal | तटरक्षक दलाच्या सहाय्यक कमांडंट पदांसाठी 14 जुलैपासून अर्जप्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Coast Guard

तटरक्षक दलाच्या सहाय्यक कमांडंट पदांसाठी 14 जुलैपासून अर्जप्रक्रिया

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

भारतीय तटरक्षक दलाने (ICG) सहाय्यक कमांडंट पदावर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

सोलापूर : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) (Indian Coast Guard) सहाय्यक कमांडंट (Assistant Commandant) पदावर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. सहाय्यक कमांडंटच्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आयसीजीने रविवारी 4 जुलै रोजी सुरू केली आहे आणि 14 जुलै 2021 पर्यंत उमेदवार ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतील. आयसीजी असिस्टंट कमांडंट पोस्टसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. (The application process for the post of Assistant Commandant of the Indian Coast Guard starts from July 14)

हेही वाचा: पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाइन ! कोरोनामुळे विद्यापीठाचा निर्णय

https://joinindiancoastguard.gov.in/pdf/AC_NOTICE_122.pdf या लिंकवर भरती सूचना पाहू शकता तसेच https://joinindiancoastguard.gov.in/Default.aspx या लिंकद्वारे अर्ज करू शकता.

असिस्टंट कमांडंट पदे भरतीसाठी भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या नोटिशीनुसार सहाय्यक कमांडंट जनरल ड्यूटीसाठी 40 आणि तांत्रिक (अभियांत्रिकी / इलेक्‍ट्रिकल) 10 पदे भरती करण्यात येणार आहेत. यापैकी एसी जीडीची 11 आणि एसी टेक्‍निकलची 3 पदे अनारक्षित गटात आहेत, तर उर्वरित पदे आरक्षित प्रवर्गातील (एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस) उमेदवारांसाठी आहेत.

हेही वाचा: आठवी ते बारावीची भरणार ऑफलाइन शाळा ! शिक्षकांना राहावे लागणार गावातच

पदांसाठी ही आहे पात्रता

भारतीय तटरक्षक दलाच्या असिस्टंट कमांडंट जनरल ड्यूटीच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थांकडून किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. तसेच, उमेदवारांनी 10 + 2 पातळीवर गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषयांचा अभ्यास केलेला असावा. त्याचबरोबर सहाय्यक कमांडंट टेक्‍निकल पोस्टसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी किमान 60 टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केला पाहिजे. तसेच गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषयांचा 10 + 2 पातळीवर अभ्यास केलेला असावा.

टीप : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचना आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भातील सूचना वाचावी.

loading image