esakal | विद्यार्थ्यांनो, Vocational courses करायचे? खासगी विद्यापीठात प्रवेशासाठी शेवटची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत दिली असून या परीक्षेचा निकाल २६ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल, अशी माहिती ‘पेरा इंडिया’चे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.

Vocational courses करायचे? खासगी विद्यापीठात प्रवेशासाठी शेवटची संधी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पुणे: राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनन्ट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (पेरा इंडिया) माध्यमातून विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, विधी आणि ॲग्री इंजिनिअरिंग अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शेवटची संधी म्हणून ऑनलाईन‘पेरा सीईटी २०२१’ ही परीक्षा घेण्यात येत आहे. ही सीईटी परीक्षा १९ आणि २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान ऑनलाइनद्वारे होणार आहे. परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत दिली असून या परीक्षेचा निकाल २६ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल, अशी माहिती ‘पेरा इंडिया’चे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.

हेही वाचा: खासगी विद्यापीठांत प्रवेशासाठी ‘पेरा सीईटी’

राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना जेईई आणि एमएच-सीईटीच्या परीक्षांना मुकावे लागले होते. या विद्यार्थ्यांसाठी ‘पेरा इंडिया’तर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १९ ऑक्टोबरला ऑनलाइन सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी विद्यापीठांच्या संघटनेतर्फे १९ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘पेरा’सीईटीच्या आधारे राज्यातील विद्यार्थ्यांना १४ खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना घरात बसूनच ही सीईटी परीक्षा देता येईल. याबाबत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘www.peraindia.in’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.

हेही वाचा: 'पेरा सीईटी'च्या तारखा जाहीर; राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात!

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे, विश्‍वकर्मा विद्यापीठ, पुणे, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, स्पायसर ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, संदीप विद्यापीठ (नाशिक), संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर), एमजीएम विद्यापीठ (औरंगाबाद), एमआयटी डब्ल्युपीयु युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील विद्यापीठ अँबी (पुणे), विजयभूमी युनिवर्सिटी, सोमय्या विद्यापीठ (मुंबई), डी.वाय पाटील ॲग्रीकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ (कोल्हापूर) ही विद्यापीठ पेरा संघटनेचे सदस्य आहेत.

loading image
go to top