'पेरा सीईटी'च्या तारखा जाहीर; राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात!

PERA_CET
PERA_CET

पुणे : कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने 'एमएच-सीईटी'संदर्भातील निर्णय पुढे ढकलला आहे. मात्र खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील विविध १९ खासगी विद्यापीठांची संघटना असलेल्या 'पेरा' (प्रिमीयंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) यांनी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन 'पेरा सीईटी -२०२०' च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

ही प्रवेश परीक्षा ३१ जुलै रोजी सुरू होणार असून २ ऑगस्ट २०२० रोजी संपणार आहे. या परीक्षांचा निकाल पाच ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड आणि उपाध्यक्ष भारत अग्रवाल यांनी दिली.

डॉ. कराड म्हणाले, "राज्य सरकारने १९ खासगी विद्यापीठांना प्रवेश परीक्षा घेण्यासाठी मान्यता दिली आहेत. राज्यातील या खासगी विद्यापीठांमध्ये सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मिळून जवळपास ५० हजार जागा उपलब्ध आहेत. खाजगी विद्यापीठांच्या कायद्यानुसार सरकारी एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सीईटी व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एमएच-सीईटी कधी होईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी 'पेरा' या खासगी विद्यापीठांच्या संघटनांनी ३१ जुलै, १ आणि २ ऑगस्ट २०२० रोजी पेरा सीईटी -२०२० ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेरा सीईटीच्या आधारे विद्यार्थी खाजगी राज्य विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज करून प्रवेश  निश्चित करू शकतात."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"पेरा सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. या परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना २८ जुलैपर्यत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या सीईटी संदर्भात ऑनलाइन परीक्षा पद्धती समजून घेण्यासाठी २६ आणि २७ जुलै रोजी मॉक परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे घरातूनच ही सीईटी परीक्षा देता येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com