Lookback 2021 : भारत सरकारच्या 'या' टॉप पाच विभागात बंपर भरती! वर्षअखेरपर्यंत करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'या' टॉप पाच विभागात आहेत बंपर सरकारी नोकऱ्या!
Year Ender 2021 : भारत सरकारच्या 'या' टॉप पाच विभागात बंपर भरती!

Lookback 2021 : भारत सरकारच्या 'या' टॉप पाच विभागात बंपर भरती!

चालू वर्ष 2021 संपायला सात दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारी नोकरी (Government Jobs) शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. यासाठी, तुम्ही भारत सरकारच्या (Government of India) खाली दिलेल्या विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही या पदांसाठी वर्षाच्या शेवटपर्यंत अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या भरतीबद्दल... (There are bumper job opportunities in five departments of the Government of India)

भारतीय सैन्य भरती 2021 (Indian Army Recruitment 2021)

भारतीय सैन्यात तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC-135) अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पदांसाठी रिक्त जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार https://joinindianarmy.nic.in/default.aspx या लिंकवर क्‍लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे इंडियन आर्मी टीजीसी भरती 2021 (Indian Army TGC Recruitment 2021) अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. अविवाहित पुरुष उमेदवार या भरतीसाठी (Recruitment) अर्ज करू शकतात.

हेही वाचा: NEET PG समुपदेशनाला विलंब! IMA ची पंतप्रधानांना हस्तक्षेपाची विनंती

UPSC भरती 2021 (UPSC Recruitment 2021)

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission - UPSC) ने अभियांत्रिकी (Engineering) विभागात मुख्य अभियंतासह विशेष सचिव (अभियांत्रिकी), केंद्रशासित प्रदेश, चंदीगड (Chandigarh), उपविभागीय अभियंता (स्थापत्य) (Architecture) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार https://upsconline.nic.in/ora/VacancyNotice या लिंकवर क्‍लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. यासह, तुम्ही https://upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-18-2021-Eng-101221_0.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 6 पदे भरली जातील.

BSF भरती 2021 (BSF Recruitment 2021)

सीमा सुरक्षा दल (BSF) ने गट 'C' कॉम्बॅटाइज्ड (Combatized) (नॉन-राजपत्रित अ-मंत्रालयी) अंतर्गत ASI, HC आणि कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. BSF चा भाग बनू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार या पदांसाठी थेट http://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=3d4da058-cf5b-12eb-bafc- या लिंकवर क्‍लिक करून अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही http://rectt.bsf.gov.in/static/bsf/pdf/BSF%20Group-C%20Engineers%20Recruit या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 72 पदे भरली जातील.

हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली 247 लिपिक पदांची भरती!

सैनिक स्कूल भरती 2021 (Sainik School Recruitment 2021)

सैनिक स्कूल, रेवामध्ये TGT आणि PGT शिक्षकांच्या भरतीसाठी (Teachers Recruitment) अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार सैनिक स्कूलच्या अधिकृत वेबसाइट sainikschoolrewa.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार https://www.sainikschoolrewa.ac.in/rec या लिंकवर क्‍लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, https://www.sainikschoolrewa.ac.in/download/recruitment या लिंकद्वारे, तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता.

हेही वाचा: ITR दाखल करण्यासाठी पासवर्ड नाही! नो प्रॉब्लेम; तरीही भरू शकता रिटर्न

नवोदय विद्यालय समिती भरती 2021 (Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2021)

नवोदय विद्यालयात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. यासाठी नवोदय विद्यालय समिती (NVS) ने लेखाधिकारी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NVS च्या अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार https://navodaya.gov.in/nvs/en/Home1/ या लिंकवर क्‍लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 10 पदे भरली जातील. यापैकी नोएडा (Noida) आणि भोपाळ (Bhopal), चंदीगड (Chandigarh), हैदराबाद (Hyderabad), जयपूर (Jaipur), लखनौ (Lucknow), पाटणा (Patna), पुणे (Pune) आणि शिलॉंग (Shillong) या 08 प्रादेशिक कार्यालयांमध्ये भरती केली जाईल.

Web Title: There Are Bumper Job Opportunities In Five Departments Of The Government Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..