esakal | Education : शिक्षण क्षेत्रात करिअरच्या आहेत मोठ्या संधी, जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण क्षेत्रात करिअरच्या आहेत मोठ्या संधी, जाणून घ्या

सध्याच्या काळात शिक्षणाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

शिक्षण क्षेत्रात करिअरच्या आहेत मोठ्या संधी, जाणून घ्या

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- प्रिया काळे

दरवर्षी दहावी बारावीच्या निकालानंतर व्यवसाय मार्गदर्शन, विविध कलचाचण्या, कोणती विद्याशाखा निवडावी याचे मार्गदर्शन इत्यादी गोष्टीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जायचे. मात्र गेले सोळा महिने कोरोना परिस्थिती पाहता जे काही सुरू आहे ते ऑनलाइन माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे निकालावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. बहुतांश पालक नोकरी व्यवसायातील मंदीमुळे हवालदिल झालेत. तेव्हा पुढचा खर्च कसा पेलायचा, अशा परिस्थितीत नेमकी कोणती शाखा निवडायची, पुढे काय याबाबत मुलांच्या आणि पालकांच्या मनात संभ्रम आहे. त्याचबरोबर सध्याच्या काळात शिक्षणाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखा या सर्वात महत्त्वाच्या शाखा अशी धारणाही बदलल्याचे दिसते. विद्यार्थ्यांचा कल काहीतरी वेगळे करण्याकडे दिसतो आणि पालकही त्यांना साथ देताना दिसतात. सर्वच जण अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छीत नाहीत.

गेल्या काही वर्षात शास्त्रशाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण तुललेने कमी झाले आहे. विद्यार्थ्यांची अधिक पसंती कलाशाखेला मिळू लागली आहे. सध्याच्या कला आणि शिक्षण शाखेत उत्तमोत्तम व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या शिक्षणासोबत नोकरी करून तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे असेल त्याक्षेत्रातील अनुभव मिळवू शकता. कलेसोबतच शिक्षण क्षेत्रात व्यवसायाच्या किंवा सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. या लेखामध्ये भविष्यात कला तसेच शिक्षण क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत आणि त्याकरता काय शिक्षण घेणे आवश्यक आहे. याची सविस्तर चर्चा केली आहे.

हेही वाचा: घेतलं उच्च शिक्षण तरीही...

भारतासारख्या अतिशय प्राचीन आणि समृद्ध शैक्षणिक परंपरा लाभलेल्या देशामध्ये आजही शिक्षकाला अतिशय मानाचे स्थान दिले जाते. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रामध्ये ती पूर्व प्राथमिक पासून ते विद्यावाचस्पती पदवीपर्यंत शिक्षकाची गरज असते. सर्व विषयांना सर्व कौशल्यांना शिक्षक आवश्यक असतात. मग ते औपचारिक शिक्षण असू देत अथवा अनौपचारिक. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असते. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील पदवी महत्वाची ठरते.

शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय निवड करताना काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदी नुसार शिक्षण क्षेत्रामध्ये येत्या काळात प्रशिक्षित, अनुभवी आणि पारंगत शिक्षकांची पूर्वप्राथमिक ते महाविद्यालयीन पातळीवर प्रत्येक स्तरावर गरज पडणार आहे. अशातच कोव्हीड मुळे शिक्षणाची संकल्पना बदलून गेलेली आहे. सर्व काही बंद असतानासुद्धा शिक्षण मात्र बंद पडले नाही. ऑनलाइन शिक्षणाच्या रूपात नोकरीच्या अनेक संधी शिक्षणशास्त्र क्षेत्रातील पदवीधरांपुढे उपलब्ध झालेल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण सध्याच्या काळात नव्हे तर पुढील काही काळही अटळ आणि अपरिहार्य असणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थी शिक्षकांना भविष्यामध्ये शाळेसोबतच इतरही अनेक क्षेत्रात संधीची अनेक दारे ऑनलाईन शिक्षणाने उघडली आहेत.

हेही वाचा: 'शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी 10 हजार कोटी'

शिक्षण क्षेत्रातील पदवी अर्थात बीएड अथवा एम एड पूर्ण केल्यानंतर माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते. बी एड आणि एम एड या पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षे इतका आहे. एन सी टी ई म्हणजेच नॅशनल कॉन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन ची मान्यता असणाऱ्या संस्थेमध्येच बी एड अथवा एम एड पदवीसाठी प्रवेश घ्यावा. त्याव्यतिरिक्त कोणत्याही संस्थेमध्ये बी एड अथवा एम एड पदवी पूर्ण करू नये. कारण एन सी टी ई मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधील पदवी भारतातील सरकारी, खाजगी शाळांमध्ये ग्राह्य धरली जाते. अशा संस्थेमधून बी एड अथवा एम एड केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ म्हणजेच एसएससी बोर्ड, सी बी एस सी बोर्ड, आय सी एस सी बोर्ड, आय जी सी एस सी बोर्ड, आयबी बोर्ड या शाळांमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक होऊ शकते.

केवळ एवढंच नाही तर पुढेही

उच्च शिक्षण घेतल्यास या शाळांमध्ये समन्वयक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्रकल्प संचालक, शैक्षणिक संचालक यासारखी पदे मिळू शकतात. शाळेच्या स्वरूपावरून म्हणजेच शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा नुसार वेतन निश्चिती केली जाते. शिक्षण, अनुभव, कौशल्य यानुसार शिक्षण क्षेत्रात शाळांमध्ये सरासरी 15,000/-ते 20,000/-पगार दरमहा मिळू शकतो.शिक्षकांना त्यांच्या शिक्षण, अनुभव आणि कौशल्यानुसार तसेच कामाच्या स्वरूपानुसार किमान 5,000/- रुपये ते 50,000/- रुपये पगार खाजगी शिक्षण संस्थामध्ये मिळू शकतो. सरकारी शाळांमध्ये नेमून दिलेल्या वेतन आयोगानुसार शिक्षकांना पगार मिळतो. काही खाजगी शाळा सरकारी आयोगाप्रमाणे शिक्षकांना वेतन देतात. आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांमध्ये दरमहा 20,000/- ते 50,000/- पगार मिळू शकतो. मानसशास्त्र विषयातील पदवीधरांना शालेय समुपदेशक म्हणून नोकरी मिळू शकते. पदव्युत्तर शिक्षण झाले असेल तर महाविद्यालयीन पातळीवर प्राध्यापक म्हणून नेमणूक होऊ शकते. त्याकरिता नेट किंवा सेट उत्तीर्ण होणे आणि पीएचडी पूर्ण करणे गरजेचे ठरते . जसजसे शिक्षक अनुभव पारंगत होत जातील आणि शैक्षणिक अर्हता पूर्ण करत जातील तसा तसा पगार वाढत जातो.

हेही वाचा: प्रभारी कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभागाचा कारभार

तुम्ही जर तुमच्या विषयांमध्ये पारंगत असाल आणि तुमच्याकडे शिक्षणशास्त्रातील पदवी असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये e-content तयार करणाऱ्या कंपन्यांमध्येही नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त होतात. कंटेंट तयार करणे, लिहिणे यासाठी या कंपन्यांना विशिष्ट पदवीधर तसेच बीएड अथवा एमेड पूर्ण झालेले कुशल व अनुभवी लोक लागतात. शालेय अथवा महाविद्यालयीन पातळीवरील विषयांसाठी e-content तयार करण्यात येतो. त्यामध्ये भाषा, गणित, शास्त्र, सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश होतो. या विषयांचे अभ्यास साहित्य, चाचण्या तयार करण्यासाठी त्या त्या विषयातील पदवीधर आणि बी एड पूर्ण झालेले लोक निवडले जातात. या कंपन्यांमध्ये उत्तम पगार तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील सोयी सुविधा दिल्या जातात.

याच बरोबर संशोधन क्षेत्रातही नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. शिक्षणातील विविध स्तरावरील संशोधनासाठी सहाय्यक संशोधकांची गरज असते. विशेष करून एम एड पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती पूर्णवेळ सहायक संशोधकाचे काम करू शकते. संशोधन क्षेत्रातील अनुभव पुढे कामी येतो आणि त्यावर आधारित संशोधन प्रकल्प हाती घेतले जाऊ शकतात. देश विदेशातील विविध संस्था या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देतात. याव्यतिरिक्त पाठ्यपुस्तक लेखन, संदर्भ ग्रंथ लेखन, शिक्षण क्षेत्राविषयी वृत्तपत्र लेखन, ब्लॉग यासारख्या गोष्टी करता येतात. स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू करता येतात. खाजगी शिकवण्या सुरू करता येतात. आज काल बऱ्याच मुलांसाठी पालक खाजगी शिकवणीचा आग्रह धरताना दिसतात. शिक्षणशास्त्रातील पदवी प्राप्त केल्यानंतर इच्छा असेल तर स्वतःची शाळा सुद्धा सुरू करता येते. शाळेतील अध्यापनासोबतच तुम्ही एम पी एस सी किंवा यू पी एस सी च्या परीक्षा देऊन शिक्षणाधिकारी / शासकीय अधिकारीही बानू शकता.

याच बरोबर संशोधन क्षेत्रातही नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. शिक्षणातील विविध स्तरावरील संशोधनासाठी सहाय्यक संशोधकांची गरज असते. विशेष करून एम एड पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती पूर्णवेळ सहायक संशोधकाचे काम करू शकते. संशोधन क्षेत्रातील अनुभव पुढे कामी येतो आणि त्यावर आधारित संशोधन प्रकल्प हाती घेतले जाऊ शकतात. देश विदेशातील विविध संस्था या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देतात. याव्यतिरिक्त पाठ्यपुस्तक लेखन, संदर्भ ग्रंथ लेखन, शिक्षण क्षेत्राविषयी वृत्तपत्र लेखन, ब्लॉग यासारख्या गोष्टी करता येतात. स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू करता येतात. खाजगी शिकवण्या सुरू करता येतात. आज काल बऱ्याच मुलांसाठी पालक खाजगी शिकवणीचा आग्रह धरताना दिसतात. शिक्षणशास्त्रातील पदवी प्राप्त केल्यानंतर इच्छा असेल तर स्वतःची शाळा सुद्धा सुरू करता येते. शाळेतील अध्यापनासोबतच तुम्ही एम पी एस सी किंवा यू पी एस सी च्या परीक्षा देऊन शिक्षणाधिकारी / शासकीय अधिकारीही बानू शकता.

सध्याच्या युगात स्वतःचे युट्युब चॅनेल तयार करून त्यावर व्हिडिओ अपलोड करून ऑनलाइन शिक्षण देता येऊ शकते. स्वतःचे मुक्स (MOOCs : Massive Open Online Courses) तयार करता येतात. या सर्व गोष्टी शिक्षक म्हणून नोकरी करतानाही करता येतात. जसजसा तुमचा अनुभव आणि शिक्षण वाढत जाते त्याप्रमाणे पगार आणि इतर सोयी सुविधा मिळत जातात. सरासरी 30 ते 50 हजार रुपये महिना शिक्षक कमवू शकतात. त्याकरिता डीएड, बीएड अथवा एम एड पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे. बारावीनंतर डीएड ला प्रवेश मिळू शकतो. बीएड करण्यासाठी किमान 50 टक्के मार्कांसह कोणत्याही विषयातील पदवी असणे तसेच बीएड CET परीक्षा देणे अनिवार्य आहे. एम एड करण्यासाठी किमान 50% मार्कांसह बी एड पदवी असणे आणि एम एड CET परीक्षा देणे अनिवार्य आहे.त्याचप्रमाणे खाजगी विद्यापीठांसाठी प्रिमिनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन तर्फे बी एड आणि एम एड CET परीक्षा (पेरा CET) घेतल्या जातात. ती देऊनही बी एड अथवा एम एड ला प्रवेश मिळतो. पदवी मिळवल्यानंतर शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरी करणे, संशोधन क्षेत्र निवडणे, कॉर्पोरेट क्षेत्रात e-content कंपनीमध्ये जाणे अथवा स्वतःचा कोचींग क्लास सुरू करणे यासारखे अनेक पर्याय शिक्षण क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला जर अध्यापनाची आवड असेल किंवा तुम्ही आशय तयार करण्यामध्ये पारंगत असाल तर शिक्षण क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. भविष्यात नोकरीच्या तसेच व्यवसायाच्या उत्तमोत्तम संधी तुमची वाट पहात आहेत.एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये एन सी टी ई मान्यताप्राप्त बी. एड आणि एम एड पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सन २०२१ करीता प्रवेशासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या. www.mitwpu.edu.in

बीएडला अर्ज करण्यासाठी, ह्या संकेतस्थळावर भेट द्या https://admissions.mitwpu.edu.in/b-ed/ आणि एमएडला अर्ज करण्यासाठी, ह्या संकेतस्थळावर भेट द्या https://admissions.mitwpu.edu.in/med/

(लेखिका- पुणे एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत)

loading image
go to top