दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी! पोस्ट विभागात ड्रायव्हर पदाची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Post

टपाल विभागाने मेल मोटर सर्व्हिस युनिट, चंदीगडमध्ये कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागविले आहेत.

दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी! पोस्ट विभागात ड्रायव्हर पदाची भरती

सोलापूर : जर तुम्ही टपाल विभागातील (Indian Post) ड्रायव्हर पदी भरतीच्या संधींची वाट पाहात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. टपाल विभागाने मेल मोटर सर्व्हिस युनिट (Mail motor service unit), चंदीगडमध्ये कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागविले आहेत. टपाल विभागाने शनिवार, 21 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार मेल मोटर सर्व्हिस युनिटमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य केंद्रीय सेवा, गट सी, नॉन-मिनिस्ट्रियल, नॉन -गॅझेटेड) पदासाठी थेट भरतीची एकूण 11 पदे आहेत. या पदांवर नियुक्त उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्‍स स्तर -2 (19,900 ते 63,200 रुपये) नुसार वेतन दिले जाईल.

हेही वाचा: पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! 'या' दिवशी लेखी परीक्षा

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार भरती अधिसूचना आणि अर्ज फॉर्म पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या indiapost.gov.in या लिंकवरून डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी हा फॉर्म पूर्ण भरून आणि आवश्‍यक कागदपत्रे पत्त्यावर संलग्न करून 20 सप्टेंबर 2021 पर्यंत व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस युनिट, जीपीओ बिल्डिंग, सेक्‍टर - 17, चंदीगड - 160017 या पत्त्यावर सादर करावा. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की त्यांना त्यांचा अर्ज फक्त नोंदणीकृत पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे पाठवावा लागेल. सामान्य पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

हेही वाचा: अकरावी प्रवेश : सायन्स अन्‌ कॉमर्सलाच विद्यार्थ्यांची पसंती !

जाणून घ्या पात्रता

पोस्ट विभागाने जारी केलेल्या स्टाफ कार ड्रायव्हर भरती अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. तसेच वैध LMV आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्‍यक आहे आणि किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख म्हणजेच 20 सप्टेंबर 2021 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गांसाठी (एससी, ओबीसी आणि इतर) वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे. अधिक तपशिलासाठी भरती अधिसूचना पाहा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viraleducationjobsupdate
loading image
go to top