भारतीय विद्यार्थ्यांसाठी दहावी पास झाल्यानंतर या आहेत करिअरच्या संधी

These are the career opportunities after passing 10th Marathi article
These are the career opportunities after passing 10th Marathi article

कोल्हापूर : दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थी करिअर संदर्भात नेहमी कन्फ्युज होतात. पण हे आर्टिकल वाचल्या नंतर तुम्हाला करिअर निवडण्यासाठी  मदत होईल.

विद्यार्थ्यांना  करियर निवडताना स्वातंत्र्य  मिळते

दहावी शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे सर्व निर्णय पालक व त्यांचे जवळचे नातेवाईक घेत असतात. मात्र दहावीची परीक्षा झाल्यानंतर  विद्यार्थ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जाते. खूप सारे ऑप्शन्स असल्यामुळे तुम्हाला करिअर निवडताना अडचणी खूप येत असतील. मात्र निरीक्षण आणि डिस्कशन नंतर घेतलेला निर्णय हा नेहमी फायदेशीर ठरू शकतो.

विद्यार्थ्यांच्या जीवनातला महत्वाचा निर्णय

भारतीय विद्यार्थी दहावी परीक्षेनंतर नेहमी कन्फ्युज असतात की पुढं काय करावं? जो करिअरचा ऑप्शन निवडणार आहे. तो योग्य तर ठरेल ना? हा प्रश्न त्यांच्या डोक्यात घोळत असतो. अशा वेळी ते आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावरती असतात. त्यामुळे भावी करिअरच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते.याच दरम्यान त्यांचा एखादा चुकीचा निर्णय देखील त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर  परिणाम करू शकतो. आणि याचा परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागते.

दहावीनंतर करिअरचे ऑप्शन्स

दहावी परीक्षा पास झाल्यानंतर आता पुढे काय करावे? प्रोफेशनल कोर्स निवडावा, ट्रॅडिशनल कोर्स निवडावा अशा प्रश्नाने विद्यार्थ्यांचे डोके भांडाऊन  जाते. आणि यामुळेच विद्यार्थी गोंधळून जातात. वस्तुनिष्ठपणे विचार केला तरी त्या सगळ्याचा संबंध त्यांचा भविष्यातील अध्यापनाचा आणि प्रोफेशनशी असतो. अशावेळेस अशा प्रश्नांविषयी गोंधळून जाणे स्वभाविक आहे.

सायन्स:

 विज्ञान हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप आवडीचा विषय असतो. ज्यादातर आई-वडिलांची देखील इच्छा अशीच असते की त्यांच्या मुलगा हा विज्ञान विषयांमध्ये शिकावा. हा विषय विद्यार्थ्यांना इंजिनीरिंग, चिकित्सक, आयटी आणि कॉम्प्यूटर विज्ञान अशा आकर्षक करियरसाठी महत्त्वाचा ठरतो.दहावीनंतर विज्ञान हा विषय निवडण्याचा आणखीन एक फायदा असतो की, ते पुढे जाऊन आर्ट्स, कॉमर्स देखील विषय घेऊ शकतात. याउलट आपण बारावीनंतर आर्ट्स कॉमर्स केला असेल तर आपण विज्ञानासाठी ऍडमिशन नाही घेऊ शकत.  विज्ञानाचा फायदा असा आहे की, इंजिनिअरिंग कॉम्प्युटर याचबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र असे देखील विषय आपण निवडू शकतो.  विद्यार्थ्यांनी निवडलेल्या इन्स्ट्रक्शन भाषेच्या आधारावर एक अनिर्वाय भाषादेखील निवडू शकता. सोबत क्लासमध्ये थेरी, वाचन याशिवाय लॅब आणि प्रॅक्टिकल देखील करू शकता. जर तुम्हाला इंजीनियरिंग आवडत असेल तर भौतिकशास्त्र, विज्ञान आणि गणिताची निवड देखील करू शकता. जर तुम्हाला मेडिकल फिल्ड निवडायचं असेल तर रसायनशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, गणित आणि जैवविज्ञान हे विषय निवडता येतात.

कॉमर्स

बिझनेस साठी हा  एक ऑप्शन ठरू शकतो. सायन्स नंतर सगळ्यात जास्त आवडीने विषय घेतला जात असेल तर तो म्हणजे कॉमर्स.जर तुम्हाला स्टेटस्तिक, फायनान्स, इकॉनॉमिक्स या क्षेत्रात जायचं असेल तर तुम्ही कॉमर्स निवडू शकता .जर तुम्हाला अकाउंट, कंपनी सेक्रेटरी, बँकिंग अशा महत्त्वाच्या करिअर निवडण्यासाठी देखील याची मदत होते. यासाठी बारावीनंतर कॉमर्स तुम्ही निवडू शकता. बिझनेस अकौटंट, बिझनेस अकॅडमी, बिझनेस स्टडी, इन्कमटॅक्स, मार्केटिंग, जनरल बिझनेस अकौटंट आधी जॉब साठी देखील तुम्ही कॉमर्स निवडू शकता.

आर्ट्स कला क्रिएटिव्हिटी आणि करियर 

आर्ट्स विषय विद्यार्थ्‍यांच्‍या मध्ये खूप पसंतीचा चा आहे, कारण या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत.  अलीकडच्या काळात या विषयाला घेऊन लोकांची धारणा बदलली आहे. अधिकांश विद्यार्थी  आर्ट्स विषय घेणे सध्या पसंत करतात कारण यातून काही नाविन्यपूर्ण आणि रोमांचक करियर करण्याची संधी मिळते. पहिला आर्ट्स विषयाच्या विद्यार्थ्यांना योग्य असे समजले  जात होते. जे पुढे जाऊन संशोधन मध्ये आपली आवड दाखवतात. परंतु आता ही धारणा पूर्णपणे बदलून गेली आहे .आज कालचे आर्ट विषयाचे विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमाप्रमाणे आकर्षक आणि समाधान पूर्वक  करिअर करू शकतात.आर्ट्स चे विद्यार्थी पत्रकारीता, संशोधन, सामाजिक कार्य, शिक्षण आणि अशा अनेक पर्यायाचा निवड करू शकतात. जिथेपर्यंत विषयाचा संबंध आहे. आर्ट्स विद्यार्थी विविध विषयाची निवड करू शकतात ज्यामध्ये समाजशास्त्र, इतिहास, साहित्य, मनोविज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा विषयांचा समावेश आहे. याच बरोबर एका भाषा विषयाची निवड करणे सक्तीचे असते. गेल्या दहा वर्षांमध्ये याव्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात अनेक  विविधता दिसून आली आहे. यामुळेच दहावीनंतर या विषयातून अनेक संधी निवडता येतात  काही असे शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस अथवा व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. तसेच काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत जे आपण दहावी ची परीक्षा दिल्यानंतर निवडू शकतो. दहावीच्या नंतर विद्यार्थ्यांना कोण कोणत्या संधी असतात अथवा त्याची मानसिकता काय आहे आणि तो नेमका कोणता विषय निवडावा हे जर आपणास पाहिजे असेल तर अशावेळी तुम्ही कौन्सिलर ची मदत घेऊ शकता.

विद्यार्थ्यांनो करिअरच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत असाल तर या गोष्टींचा करा विचार

आता तुम्हाला प्रत्येक विषयाची जाणीव झालेली असते. किंवा तो विषय माहिती झालेला असतो.हीच ती वेळ असते ज्या वेळेस तुम्ही खूप महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतात.परंतु तुम्हाला जर निर्णय घेताना भीती वाटत असेल तर घाबरून जाऊ नका. घाईगडबडीने कोणतेही निर्णय घेऊ नका.तुमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मदत होण्यासाठी काही दिशादर्शक असे मार्ग सांगण्यात येतील याचे तुम्ही योग्य पद्धतीने पालन करा.

तुमच्या आवडीनुसार निवडा कोर्स आणि करियर

बर्‍याचदा असे होते की, आपल्या मनाविरुद्ध कोर्स निवडला जातो किंवा करिअर निवडले जाते. याचा त्रास आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सहन करावा लागतो.जीवनात अशा गोष्टींपासून किंवा परिस्थिती पासून वाचण्यासाठी नेहमी आपल्या आवडीचा आणि छंदाचा विचार करा.या प्रक्रियेतील तुमचं पहिलं पाऊल असेल की तुम्हाला कोणतं करिअर निवडायचे आहे याचा विचार करणे.असे करण्याने  जीवनभर तुम्ही कधीही असंतुष्ट राहणार नाही किंवा नाराज होणार नाही. तुम्ही कोणताही विषय निवडा यामध्ये परिपूर्ण होण्यासाठी यातील प्रत्येक विषयाचा गांभीर्याने अभ्यास करा.

विद्यार्थ्यांनी आपल्यातील ताकद आणि कमजोरी याविषयी विश्लेषण करणे खूप गरजेचे आहे

आपल्यातली आवड जाणून घेण्या नंतर जी सेकंड ची स्टेप आहे ती म्हणजे आपल्या मध्ये क्षमता किती आहे हे जाणून घेणे.तुम्ही फक्त आवडीचा विचार केला आणि निवडलेल्या विषयांमध्ये जर  सगळ्या विषयांना न्याय नाही देऊ शकला. तर तुमच्यामध्ये विषयाला समजण्याची क्षमता आणि स्किल नसेल तर याचा त्रास तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. आणि एक मोठी समस्या होऊ शकते. उदा : तुम्ही दहावी मध्ये सायन्स विषय सहजपणे सोडवू शकता मात्र बारावीला गेल्यानंतर तोच विषय तुम्हाला अवघड वाटेल. यासाठी आपल्या स्कील आणि क्षमतेचे विश्लेषण नेहमी केले पाहिजे.आपली ताकद आणि आपली कमजोरी या दोन्ही गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आणि मगच करिअर निवडले पाहिजे.

विद्यार्थ्यांनो स्वता:साठी निवडा योग्य करिअर

ज्यावेळी तुम्ही स्वतःला ओळखायला सुरूवात कराल त्या वेळेस तुम्हाला करिअरचे अनेक पर्याय समोर उभे राहतील. यातून एका विषयाची निवड करण्यास तुम्हाला सहज मदत होईल. यासाठी तुम्ही प्रोफेशनल काउंसलर ची पण मदत घेऊ शकता.जे तुम्हाला तुमच्यातील कौशल्य दाखवून देण्यास मदत करतील आणि तुम्हाला करिअर निवडण्यासाठी यांची मदत होईल.

विद्यार्थ्यांनो तुम्ही दुसऱ्यांची मदत घेऊ शकता

वरील सांगितलेल्या माहिती नंतर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला विषय निवडण्यासाठी अडचण निर्माण होते तर तुम्ही तुमच्या आई -वडिलांची, प्रोफेशनल काउंसलरची आणि सीनियर यांची मदत घेऊ शकता.आजकाल मार्केट मध्ये बरेच पर्याय निर्माण झाले आहेत.संधी याचा वापर तुम्हाला करिअर निवडण्यासाठी मदत होऊ शकेल. आई -वडील प्रोफेशनल काउंसलर ,सीनियर  लोक तुम्हाला नेहमीच करिअर निवडण्यासाठी मदत करतील.याचा नक्कीच  फायदा  तुम्हाला होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com