तुमचा पहिला जॉब आहे का? मग वाचा 'या' टीप्स अन् घडवा करीअर

टीम ई सकाळ
Thursday, 18 February 2021

'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इप्मेशन' या नियमानुसार जर विचार केला तर ऑफीसमधील सुरुवातीचे दिवस तुमचे करिअर घडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. त्यामुळे चांगली तयारी करा आणि पूर्ण आत्मविश्वासाने समोर जा. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

नागपूर : महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर काहीजण लगेच कॅम्पस सिलेक्शन होऊन नोकरीवर लागतात. पहिला जॉब, मोठी कंपनी, कामाचे तास या सर्व गोष्टी पाहून नक्कीच आपण घाबरत असतो. मात्र, अशावेळी आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल टाकणे गरजेचे आहे. 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इप्मेशन' या नियमानुसार जर विचार केला तर ऑफीसमधील सुरुवातीचे दिवस तुमचे करिअर घडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. त्यामुळे चांगली तयारी करा आणि पूर्ण आत्मविश्वासाने समोर जा. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

रिसर्च करा -
तुम्हाला ज्या कंपनीमध्ये नोकरी लागली असेल त्या कंपनीविषयी पूर्ण रिसर्च करा. महिला-पुरुष गुणोत्तर, महिलांना मिळणारे स्थान, त्यांचे महत्व, कार्य पद्धती, तसेच महिलांसाठी कंपनीचा दृष्टीकोण या सर्व बाबींबाबत रिसर्च करा. 

बदल स्वीकारा -
एक लहान कंपनी किंवा मल्टीनॅशन कंपनीमध्ये तुम्हाला जॉब असेल तर सुरुवातीला कंपनीला समजण्यात पूर्ण वेळ द्या. तुमच्या कंपनीमध्ये परिचय मेळावे होत असेल तर नक्की सहभाग घ्या. तसेच प्रत्येक सेशन समजून घ्या आणि नोट देखील काढा. तसेच गरज असेल तर अनुभवी सहकाऱ्यांची मदत घ्या. नवीन जॉब असल्याने तुम्हाला खूप सतर्क राहणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - तुम्हालाही उत्तम बॉस बनायचे आहे? मग 'हे' सात...

महिलांसंबंधी असलेल्या नियमांचा विचार करा -
तुम्ही विवाहीत असाल आणि प्रसूतीच्या काळात तुम्हाला सुट्ट्या हव्या असतील, तर त्या पॉलिसीबद्दल आधीच माहिती करून घ्या. तसेच तुमच्या गर्भवती असण्यासाठी नवीन ऑफीस ठीक आहे की नाही याबाबतही माहिती गोळा करा. याबाबत कोणाकडून माहिती मिळत नसेल तर एचआरला विचारा. मॅटर्निटी लीव्हज, नर्सिंग ब्रेक, क्रेश सुविधा आदी प्रश्न एचआऱला आधीच विचारा. मात्र, यावेळी अगदी प्रोफेशनरितीने बोलायाला विसरू नका.

प्रोफेशनल अप्रोच -
जो प्रोफेशनल असतो तो नेहमी कंपनीच्या फायद्याचा विचार करत असतो. सर्वसाधारणपणे विचार केला तर पहिला जॉब असेल तर व्यक्ती प्रोफेशनल नसतो. त्यामुळे तुमचा कमी प्रभाव पडू शकतो. त्यामुळे ऑफीसमध्ये वावरताना प्रत्येक बाबतीत प्रोफेशनली वागायला पाहिजे. ऑफीसच्या प्रत्येक गोष्टी गंभीरतेने समजून घ्यायला पाहिजे. तसेच प्रत्येक संवादाचा रेकॉर्ड हा मेलवर ठेवा. तसेच कोणावरही कुठलीही वैयक्तिक कमेंट करू नका.

सौम्य भाषेचा वापर -
ऑफीसमधील राजकारण किंवा कोणाविषयी तुमचे वैयक्तीक मत कोणाला सांगताना दहावेळा विचार करा. तसेच अशा कमेंट्स आपण टाळायला पाहिजे. तसेच कोणासोबतही बोलताना भाषा अगदी सौम्य असायला पाहिजे. महाविद्यालयीन जीवनानंतर आपण नोकरी करायला लागलो की त्याठिकाणी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सुरुवातीलाच खूप विचार करून पावले उचला. महाविद्यालयीन जीवन विसरून  फ्रोफेशनल जीवन जगायला शिका. ऑफीसमध्ये फक्त कामाबद्दलच बोलायला पाहिजे. तसेच तुम्हाला काही वैयक्तीक बोलायचं असेल तर ब्रेकमध्ये बोलू शकता. विचारमंथन करतानाही दुसऱ्याचे दृष्टीकोण समजून घ्या. तुम्हाला काहीही कळत नसेल तर शांत बसायला हवे. मात्र, उगाच वाद घालण्यात अर्थ नाही. तसेच सॉरी, धन्यवाद, हे मी करू शकते का? अशा शब्दांचा आदरपूर्वक वापर करा.

हेही वाचा - प्रयत्न करूनही यश मिळत नाही? मग वाचा 'हे'...

कोणाशीही भावनिक नातं ठेवू नका -
तुमचा पहिला जॉब असेल तर ऑफिसमध्ये काही शेअर करण्यासाठी एका चांगल्या मित्राची गरज असणे स्वाभाविक आहे. मात्र, सुरुवातीला कोणावरही विश्वास ठेवू नका. तसेच कोणाशीही भावनिक नाते तयार करू नका. ऑफीस ही मित्र तयार करण्याची जागा नाही, असे म्हणतात आणि ते तितकेच खरे आहे. त्यामुळे ऑफीसमध्ये आपले काम करा आणि वैयक्तीक गोष्टी ऑफीस संपल्यानंतर आपल्या मित्रांजवळ शेअर करा. ऑफीसमध्ये सर्वाधिक ऐकणे. मात्र, खूप कमी बोलणे, हा नियम जर तुम्ही पाळला तर नक्कीच यश मिळेल. मात्र, ऑफीसमध्ये पूर्णपणे शांतच बसावे असे नाही. लोकांना भेटा, ओळखी वाढवा. मात्र, हे सर्व करताना एक सशक्त आणि प्रोफेशन महिलेसारखे वागणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tips keep in mind when you joined the first job nagpur news