पाकिस्तानातून उच्चशिक्षण घ्यायचेय? तर AICTE कडून 'NOC' अत्यावश्‍यक

तुम्हाला पाकिस्तानातून उच्च शिक्षण घ्यायचेय? तर AICTE कडून 'NOC' अत्यावश्‍यक
AICTE
AICTESakal
Summary

AICTE ने पाकिस्तानस्थित शैक्षणिक संस्थांमधून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कौन्सिलचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे.

सोलापूर : तुम्ही भारतीय (India) नागरिक असाल किंवा भारताचे परदेशी नागरिक असाल आणि पाकिस्तानमधील (Pakistan) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education - AICTE) ने पाकिस्तानस्थित शैक्षणिक संस्थांमधून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कौन्सिलचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. 26 ऑक्‍टोबर 2021 रोजी कौन्सिलने जारी केलेल्या सूचनेनुसार, पाकिस्तानमधील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिक / भारतीय परदेशी नागरिकाने AICTE कडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक आहे.

AICTE
विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी आता ऑनलाइन! शिक्षण विभागाचा निर्णय

या वेबसाइटवर मिळवा ना-हरकत प्रमाणपत्र...

AICTE ने आपल्या जाहीर सूचनेमध्ये म्हटले आहे की, अशा सर्व विद्यार्थ्यांना ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी AICTE च्या अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर उपलब्ध करून दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.

का आहे ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता?

सदस्य सचिव, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन यांनी जारी केलेल्या अपडेटमध्ये असे म्हटले आहे, की अनेक विद्यार्थी तांत्रिक क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परदेशात जातात. यातील अनेक विद्यार्थी मान्यता नसलेल्या अशा संस्था किंवा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना या पदव्यांचे प्रमाणीकरण आणि समकक्षतेसाठी त्रास सहन करावा लागतो. AICTE च्या सूचनेनुसार, कधी कधी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पदव्या भारतीय संस्थांच्या पदवीच्या बरोबरीचेही नसतात. त्यामुळे अशा विनासमतुल्य तांत्रिक पदव्या मिळविण्यासाठी भरमसाठ फी खर्च करूनही अशा विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांतून पदवी मिळाल्यानंतर भारतात नोकरी (सरकारी / खासगी क्षेत्र) किंवा उच्च शिक्षणात अडचणी येतात.

AICTE
38 हजार विद्यार्थी नॉट रिचेबल! लसीकरणाचे गूगल फॉर्म भरलेच नाहीत

AICTE ने या मुद्द्याची दखल घेतली असून, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक भार पडू नये व त्यांचे शैक्षणिक तसेच भावी करिअर धोक्‍यात येऊ नये यासाठी AICTE कडून इशारा देण्यात येत आहे की, विद्यार्थ्याने अशी पदवी मिळवण्यापूर्वी त्याची वैधता काळजीपूर्वक तपासली पाहिजे व AICTE कडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com