MPSC च्या ४१६ नियुक्त्या तातडीने होणार, आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSC च्या ४१६ नियुक्त्या तातडीने होणार, आज बैठक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मुख्यमंत्र्यांची सही होऊन देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) काही नियुक्त्या रखडल्या आहेत. एमपीएससीच्या ४१६ नियुक्त्या तातडीने होणार आहेत. त्याबाबत आज बैठक घेण्यात येणार आहे. याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattraya Bharane) यांनी माहिती दिली.

हेही वाचा: तरुणांमध्ये भरणे ठरले हिरो! MPSC उमेदवारांची वाढली वयोमर्यादा

एमपीएससीद्वारे भरल्या जाणाऱ्या ७ हजार पदांचं मागणीपत्र आलं आहे. त्यासाठी नियुक्ती प्रक्रिया पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे. तसेच उरलेल्या पदांसाठी पाठपुरावा सुरू आहे. कोरोनामुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात येईल असं बोललं जात होतं. त्याबाबत देखील भरणे यांनी प्रतिक्रिया दिली असून आचारसंहितेमुळे आदेश काढण्यात अडचण येत असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन लवकरच आदेश काढणार आहोत. विद्यार्थी परीक्षेला मुकणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेऊ, असेही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्यविभागाच्या परीक्षेत गोंधळ उडाला होता. अनेकांना चुकीचे प्रवेशपत्र आले होते. तसेच पेपर फुटल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या. त्याबाबत विचारले असता भरणे म्हणाले, '' आरोग्यभरतीचा पाठपुरावा राजेश टोपे करत आहेत. याबाबतच्या तक्रारींची तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच आतापर्यंत झालेल्या परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल.''

loading image
go to top