esakal | पहिल्याच दिवशी सरपंचांनी अडवली 2 हजार शाळांची NOC
sakal

बोलून बातमी शोधा

School-Closed

पहिल्याच दिवशी सरपंचांनी अडवली 2 हजार शाळांची NOC

sakal_logo
By
संजीव भागवत

शाळा सुरू झाल्याच नाहीत; संस्थाचालक संघटना संतप्त

मुंबई: कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा राज्यात आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक ग्रामीण भागातील तब्बल 2 हजाराहून अधिक गावात वेगळं चित्र दिसलं. काही गावांतील सरपंचांनी शाळा सुरू करण्यासाठी लागणारी NOC (ना हरकत प्रमाणपत्र) काही चिरीमिरीसाठी अडवून ठेवली. त्यामुळे आज या शाळा सुरूच होऊ शकल्या नाहीत, असा आरोप महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा)ने केला. (two thousand Schools in Maharashtra Corona free Villages are still closed due to Sarpanch not tendering NOC)

हेही वाचा: ठाकरे सरकारने थकवले 90 कोटी; 18 जण मागणार 'इच्छामरण'

पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून शाळांना एनओसी दिल्यानंतर त्या शाळा सुरू केल्या जात आहेत, मात्र राज्यातील दोन हजाराहून अधिक गावांमध्ये सरपंचांनी शाळांची अडवणूक करत त्यांच्या एनओसी रोखून धरली असल्याने आज आम्हाला या शाळा सुरू करता आल्या नाहीत अशी माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी दिली. याला जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींवर करवाई करुन संबंधित विद्यार्थी वर्गाला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा: सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं; भाजपचा काँग्रेसला टोला

राज्यातील अनेक शाळांच्या तक्रारी आहेत की, सरपंच हे विविध कारणे सांगून अडवणूक करत आहेत. काही ठिकाणी पूर्वग्रह दुषित हेतुने, चिरीमिरी घेतल्या शिवाय इंग्रजी शाळांना सुरु करण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आज शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यातील 2 हजाराहून अधिक शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? , असा सवाल संजयराव तायडे पाटील यांनी केला.

हेही वाचा: ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर नर्सने केला विनयभंगाचा आरोप

आम्ही तर शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे शाळा सुरू करण्याची तयारी केली. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या सूचनांचे पालन करुन घेण्याची जबाबदारी कोणाची? ते सरकारच्या आदेशाप्रमाणे कुठल्याही सुचनांचे पालन का करत नाहीत?, उलट आम्ही सर्व सुविधा पुरवण्यासाठी तयार असून देखील शाळा सुरू करण्यासाठी आडकाठी ठरत आहेत, त्यामुळे याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

loading image