esakal | ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर नर्सने केला विनयभंगाचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर नर्सने केला विनयभंगाचा आरोप

sakal_logo
By
दीनानाथ परब

ठाणे: ठाणे महापालिकेच्या (TMC) एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर नर्सचा विनयभंग (molestation) केल्याचा गंभीर आरोप आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये (covid hospital) ही घटना घडली. आरोप असलेल्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर (Vishwanath Kelkar) यांच्यावर हा आरोप आहे. (Thane deputy civic chief Vishwanath Kelkar molests nurse at hospital)

पीडित नर्सला वर्षभरापूर्वी कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी विश्वनाथ केळकर यांनी आपला फायदा उचलण्याचा प्रयत्न केला व अश्लील कमेंट केल्या, असा आरोप नर्सने केला आहे.

हेही वाचा: मुंबईत पुन्हा एकदा जमावबंदीचा आदेश लागू

केळकर यांनी फेब्रुवारी महिन्यात माझ्याबरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण मी विरोध केल्यानंतर ते माझ्यावर रागवले असा आरोप पीडित नर्सने केला आहे. तिने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

loading image