UGC NET 2023: आता 'नेट' वर्षातून दोनदा! पुढील परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर

यंदाच्या डिसेंबर २०२२चा परीक्षा कार्यक्रम उमेदवारांना युजीसीच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे.
UGC-NET exam 2021
UGC-NET exam 2021 Google

UGC NET 2023 : नेट परीक्षेच्या पुढील वर्षात जूनमध्ये होणाऱ्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १३ जून २०२३ पासून ही परीक्षा सुरु होत आहे. पण डिसेंबर २०२२ रोजीच्या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या या (डिसेंबर २०२२) परीक्षेची सविवस्तर माहिती उमेदवारांना युजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकेल. (UGC NET 2023 NET Exam Dates announced Know when exams will start)

युजीसीच्या चेअरमननं परीक्षेच्या तारखांबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, "नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) माध्यमातून युजीसीची नेट परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे. जून आणि डिसेंबर महिन्यात या परीक्षा होतील. त्यानुसार आता पहिली नेट परीक्षा जून २०२३ मध्ये होणार असून १३ ते २२ जून २०२३ दरम्यान ही परीक्षा होणार आहे.

हे ही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

डिसेंबर २०२२ ची नेट परीक्षा कधी होणार?

यंदाची डिसेंबर २०२२ ची नेट परीक्षा पुढील वर्षात २१ फेब्रुवारी ते १० मार्च २०२३ या काळात होणार आहे. यासाठी नोंदणीप्रक्रिया सुरु झाली आहे. याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२३ असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com