UGC Net Exam : युजीसी नेटच्या तारखा जाहीर

पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्तात युजीसी नेटचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध जाहिर करण्यात आले आहे.
UGC NET exam
UGC NET examsakal

पुणे - विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्तात युजीसी नेटचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध जाहिर करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत सहा ते १४ डिसेंबर या कालावधी ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

‘एनटीए’कडून परीक्षेसाठीचे केंद्र निश्चित केलेल्या शहरांची माहिती परीक्षेच्या दहा दिवस आधी प्रसिध्द केली जाणार आहे. www.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेविषयी अद्ययावत माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ‘एनटीए’कडून करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार सहा डिसेंबर रोजी दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे.

पहिल्या सत्रात इंग्रजी, हिंदू स्टडीज, कोकणी व इतर काही परिकीय भाषांची परीक्षा असेल. तर दुसऱ्या सत्रात इतिहास, मणिपुरी, जर्मन, सिंधी या विषयांच्या परीक्षा असतील. वाणिज्य विषयाची परीक्षा सात डिसेंबरला पहिल्या सत्रात तर शारीरिक शिक्षण, भारतीय संस्कृती, संगीत, फ्रेंच, संगणकशास्त्र आदी विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रात नियोजित आहेत. अशाचप्रकारे दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com