esakal | बेरोजगारांना मिळणार पगाराच्या 50% रक्कम; कसे ते वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

बेरोजगारांना मिळणार पगाराच्या 50% रक्कम; कसे ते वाचा सविस्तर

बेरोजगारांना मिळणार पगाराच्या 50% रक्कम; कसे ते वाचा सविस्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोना काळात अनेकांच्या रोजगारावर मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच या कोरोना काळात नव्या नोकऱ्या मिळणं देखील अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत बेरोजगारांना आर्थिक आधाराची गरज आहे. हेच लक्षात घेऊन बेरोजगारांना आधार देण्यासाठी आर्थिक भत्ता देण्याची तरतूद असणारी एक महत्त्वाची योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत 50 हजार लोकांचा फायदा झाला आहे. Employees' State Insurance Corporation (ESIC) ही योजना राबवते.

हेही वाचा: भागवतांचा फोटो कुणा महिलेसोबत दिसलाय का?- राहुल गांधी

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर, सरकारने 'अटल बिमित व्यक्ती कल्याण योजने'चा कालावधी 30 जून 2022 पर्यंत वाढवला आहे. याआधी या योजनेचा कालावधी 30 जून 2021 पर्यंतच होता.

अटल बीमित व्यापारी कल्याण योजनेअंतर्गत बेरोजगारांना नोकरी गमावल्यास आर्थिक मदतीसाठी भत्ता दिला जातो. एक बेरोजगार व्यक्ती 3 महिन्यांसाठी या भत्त्याचा लाभ घेऊ शकतो, जिथे तो सरासरी पगाराच्या 50% दावा करू शकतो. बेरोजगार झाल्यानंतर 30 दिवसांनी या योजनेत सामील होऊन दावा करता येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ESIC शी संबंधित कर्मचारी ईएसआयसीच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. यानंतर, ईएसआयसीद्वारे अर्जाची तपासणी केली जाईल आणि जर ती योग्य असेल तर रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठविली जाईल.

हेही वाचा: "गोडसे-सावरकरांच्या RSS विचारधारेशी समझौता कधीच शक्य नाही"

या योजनेचा लाभ कुणाला घेता येईल?

1. या योजनेचा लाभ खाजगी क्षेत्रामध्ये (संघटित क्षेत्र) काम करणाऱ्या लोकांना घेता येईल ज्यांचं दरमहा पीएफ / ईएसआय वेतन कापलं जातं.

2. खाजगी कंपन्या आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआयचा लाभ उपलब्ध आहे. यासाठी ईएसआय कार्ड (ESI card) बनवले जाते.

3. कर्मचारी या कार्डच्या माध्यमातून किंवा कंपनीकडून आणलेल्या दस्तऐवजाच्या आधारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ESI चा लाभ त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे ज्यांचे मासिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे.

या योजनेमध्ये नाव कसं नोंदवाल?

1. योजनेचा लाभ घेण्यासाठी, आपल्याला प्रथम ईएसआयसी वेबसाइटसाठी अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेचे फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे - https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793

2. आता फॉर्म भरा आणि ईएसआयसीच्या जवळच्या शाखेत जमा करा.

3. फॉर्म 20 रुपयांच्या नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर नोटरीच्या प्रतिज्ञापत्रासह असणे आवश्यक आहे.

4. यामध्ये AB-1 ते AB-4 असे फॉर्म जमा केले जातील.

हा अर्ज भरण्यापूर्वी हे लक्षात घ्या की, जर चुकीच्या वर्तनामुळे तुम्ही नोकरी गमावली असेल तर तुम्हाला या योजनेचा कोणताही फायदा होणार नाही. चुकीच्या आचरणामुळे ज्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे ते या भत्त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी खटला आहे किंवा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली आहे त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाही.

loading image
go to top