

UG & PG Exams Date 2026
Sakal
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मार्च-एप्रिल २०२६ उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सात एप्रिल आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या १६ एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार आहेत. त्यासाठी २४० केंद्रांची यादी विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे.