UPPCL करणार असिस्टंट अकाउंटंट्‌सच्या 240 पदांची भरती

UPPCL करणार असिस्टंट अकाउंटंट्‌सच्या 240 पदांची भरती
UPPCL करणार असिस्टंट अकाउंटंट्‌सच्या 240 पदांची भरती
UPPCL करणार असिस्टंट अकाउंटंट्‌सच्या 240 पदांची भरतीGallery
Summary

अधिकृत वेबसाइटला भेट देऊन श्रेणीनिहाय रिक्त पदांचा तपशील तपासू शकता.

सोलापूर : उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (Uttar Pradesh Power Corporation Limited - UPPCL) ने असिस्टंट अकाउंटंट्‌स (सहाय्यक लेखापाल) गट-सी या पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया 8 ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्‍टोबर 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट uppcl.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

UPPCL करणार असिस्टंट अकाउंटंट्‌सच्या 240 पदांची भरती
नॅशनल हेल्थ मिशनमध्ये 'एएनएम'च्या 5000 पदांची भरती!

या भरतीद्वारे एकूण 240 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन श्रेणीनिहाय रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात. अधिकृत वेबसाइट upenergy.in वर उपलब्ध संबंधित भरती अधिसूचनेमध्ये तपशीलवार माहिती दिली आहे.

या आहेत महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 8 ऑक्‍टोबर 2021

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्‍टोबर 2021

  • ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्‍टोबर 2021

  • चलनाद्वारे शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख : 30 ऑक्‍टोबर 2021

  • ऑनलाइन परीक्षेचा तात्पुरता कालावधी : डिसेंबर 2021 चा पहिला आठवडा

जाणून घ्या पात्रता व निकष

असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (कॉमर्स) शाखेची पदवी पूर्ण केली आहे. त्याचबरोबर उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे निश्‍चित केले आहे. 1 जुलै 2021 रोजी वयाची गणना केली जाईल. राज्याच्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलतेची तरतूद आहे. पात्रतेच्या निकषांच्या अधिक तपशिलांसाठी अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकता.

अशी होईल निवड

ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेच्या धर्तीवर तपशीलवार माहितीसाठी वेबसाइटला भेट देऊ शकता.

UPPCL करणार असिस्टंट अकाउंटंट्‌सच्या 240 पदांची भरती
नववी प्रवेशासाठी नवोदय विद्यालयाच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ!

असा करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्यानंतर uppcl.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. पुढे होम पेजवर उपलब्ध असलेल्या "भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करा' या लिंकवर क्‍लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. आपण येथे अर्ज भरून सबमिट करू शकता. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की अंतिम निकाल येईपर्यंत त्यांना त्यांचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी सुरक्षित ठेवावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com