UPSC Prelims 2021: अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

UPSC
UPSC

UPSC Civil Services Exam 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ साठी अर्ज करण्याची मुदत आज संपत आहे. अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करता आला नाही, त्यांनी लगेच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठीची अधिकृत लिंक बातमीच्या तळाशी देण्यात आली आहे. 

अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ४ मार्चपासून सुरवात झाली होती. २४ मार्चपर्यंत यासाठी अर्ज करण्यात येणार आहेत. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. यूपीएससी पूर्व परीक्षा २७ जून २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. 

यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि सेवांमध्ये पदभरती केली जाते. या वर्षी आयएएस, आयपीएस अशा विविध अधिकारी पदाची एकूण ७१२ पदे भरण्यात येणार आहेत. सर्वसाधारण म्हणजे खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना यासाठी १०० रुपये फी आकारण्यात येत आहे. इतर सर्व प्रवर्गातील उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात. 

आज २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दोन भागात अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन मोडद्वारे फी भरू शकता. यासाठीच्या आवश्यक लिंक बातमीच्या तळाशी देण्यात आल्या आहेत.
 
कोण करू शकतं अर्ज?
देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि कोणत्याही विषयात पदवी / पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी कमीत कमी २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ३२ वर्षे वय असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येत आहे.

- UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

UPSC Civil Service Exam 2021 अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

UPSC Application Part I भरण्यासाठी येथे ► क्लिक करा

UPSC Application Part II भरण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com