UPSC CSE : यूपीएससीचा इंटरव्ह्यू शेड्युल जाहीर, येथे बघा वेळापत्रक

मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार 13 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत 918 उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे
UPSC CSE Interview Schedule
UPSC CSE Interview Scheduleesakal

UPSC CSE Interview Schedule : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षेसाठी मुलाखतीचे वेळापत्रक (UPSC CSE 2022) प्रसिद्ध केले आहे. सर्व उमेदवार जे मुख्य परीक्षेत यशस्वी झाले आहेत आणि व्यक्तिमत्व चाचणीत बसणार आहेत ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर भेट देऊन मुलाखतीचे वेळापत्रक (UPSC CSE मुलाखत वेळापत्रक) तपासू शकतात.

अधिकृत सूचनेनुसार, 21 डिसेंबर 2022 रोजी मुख्य परीक्षेत निवडलेल्या 1,026 उमेदवारांसाठी मुलाखतीची तारीख जारी करण्यात आली होती आणि आता आयोगाने आणखी 918 उमेदवारांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक जारी केले आहे. मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार 13 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत 918 उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. उमेदवार खाली नमूद केलेल्या लिंकच्या मदतीने मुलाखतीचे वेळापत्रक तपासू शकतात.

येथे बघा इंटरव्ह्यू शेड्युलचा टाइमटेबल

Attachment
PDF
interview schedule.pdf
Preview

शेड्युल चेक करण्यासाठी या स्टेप्सचा वापर करा

स्टेप 1- व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.

स्टेप 2- दुसऱ्या स्टेपमध्ये वेबसाइटच्या होमपेजवरील What's New विभागावर क्लिक करा.

स्टेप 3- विभागावर क्लिक केल्यानंतर, मुलाखतीच्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 4- लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मुलाखतीचे वेळापत्रक स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5- शेवटी ते तपासा आणि भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपी देखील ठेवा. (Exam)

UPSC CSE Interview Schedule
IAS Tina Dabi's Husband: डॉक्टर ते शासकीय अधिकारी पद! IAS टीनाच्या पतीचा UPSC रँक माहितीये?

यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी दरवर्षी अनेक विद्यार्थी बसतात. भारतातील सगळ्यात कठीण अभ्यासक्रमांपैकी एक असा या अभ्यासक्रमाचा उल्लेख केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com