पहिली ते चौथीच्या शाळांचा बुधवारपर्यंत निर्णय | Education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिली ते चौथीच्या शाळांचा बुधवारपर्यंत निर्णय !
पहिली ते चौथीच्या शाळांचा बुधवारपर्यंत निर्णय !

पहिली ते चौथीच्या शाळांचा बुधवारपर्यंत निर्णय !

सोलापूर : दिवाळी (Diwali) सुट्टीनंतर जिल्ह्यातील चार हजार 104 शाळा (School) सुरु झाल्या आहेत. परंतु, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती 40 टक्‍केच असल्याची स्थिती आहे. दरम्यान, शहरांमधील कोरोना (Covid-19) कमी होऊनही पाचवी ते सातवीच्या शाळा बंदच आहेत. तर बहुतेक जिल्ह्यांमधील पहिली ते चौथीचे वर्ग बंदच आहेत. त्यासंबंधीचा निर्णय बुधवारपर्यंत (ता. 17) होईल, असे शालेय शिक्षण विभागातील (Department of School Education) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा बंदमुळे लाखो विद्यार्थी अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात आलेले नाहीत.

हेही वाचा: एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 'या' पदांवर नोकरीची मोठी संधी!

ग्रामीणमधील अक्‍कलकोट, करमाळा, उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा हे तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून दक्षिण सोलापूर हा तालुका कोरोनामुक्‍त झाला आहे. उर्वरित तालुक्‍यांमधील स्थितीही समाधानकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर दीड वर्षापासून बंद असलेल्या पहिली ते चौथीच्या शाळा पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. शासनाकडून अजूनपर्यंत त्यादृष्टीने स्पष्ट आदेश निघालेले नाहीत. तरीही, सर्व नियमांचे काटेकोर पालन करून पालकांसह गावकऱ्यांच्या संमतीने या शाळा उघडण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, शहरातील कोरोनाची स्थितीही सुधारली असून शहरात अवघे सात रुग्ण शिल्लक आहेत. तरीही, शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंदच आहेत. शहरातील 220 शाळांमधील जवळपास 64 हजार विद्यार्थ्यांपैकी 55 हजारांपर्यंत विद्यार्थी शिक्षणापासून अजूनही दूरच आहेत. तरीही, शासनाकडून स्पष्ट आदेश आल्यानंतरच या शाळा सुरू होतील, अशी भूमिका प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी घेतली आहे. महापालिका आयुक्‍तांनीही शासनाच्या आदेशाविना काहीच निर्णय घेऊ नका, असे त्यांना बजावल्याचे सांगण्यात आले. कोरोना कमी झाल्याने आता शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग कधीपासून सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती

  • माध्यमिक शाळा : 1240

  • एकूण विद्यार्थी : 3.83 लाख

  • प्राथमिक शाळा : 2,517

  • एकूण विद्यार्थी : 2.54 लाख

  • विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती : 2.63 लाख

हेही वाचा: तरुणांमध्ये भरणे ठरले हिरो! MPSC उमेदवारांची वाढली वयोमर्यादा

ग्रामीणमधील कोरोनाची स्थिती सुधारली असून, बहुतेक गावे कोरोनामुक्‍त झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, सर्वांसाठी कोरोनासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

loading image
go to top