esakal | UPSC Recruitment 2020: यूपीएससीने विविध विभागात काढली भरती; असे करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs_2020

अधिकृत संकेतस्थळाची आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

UPSC Recruitment 2020: यूपीएससीने विविध विभागात काढली भरती; असे करा अर्ज

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

UPSC recruitment 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली नगरपालिका परिषद आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासहित अनेक विभागांमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० आहे. या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. आणि फॉर्म भरल्यानंतर उमेदवार १ जानेवारी २०२१ पर्यंत त्याची प्रिंट घेऊ शकतात. 

Railway Jobs: रेल्वेमधील नवीन पदभरती संकटात; एकाच विभागात होणार भरती

यूपीएससी भरती २०२० : 
- असिस्टंट लीगल अॅडवाइजर : २ पदे (प्रवर्तन निदेशालय, वित्त मंत्रालयाच्या पर्यवेक्षण विभागात)
- मेडिकल फिजिसिस्ट : ४ पदे (सफदरजंग हॉस्पिटल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय)
- पब्लिक अभियोक्ता : १० पदे (राष्ट्रीय तपास यंत्रणा, गृह मंत्रालय)
- असिस्टेंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) : १८ पदे (इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग विभाग, नवी दिल्ली नगरपालिका परिषद)

रोजगाराची संधी! पोस्टात जीवन विमा अंतर्गत एजंट नेमणार!

असिस्टंट लीगल अॅडवाइजर पदासाठी पदवी तीन वर्ष अनुभव असलेले लॉ ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतात. ज्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे त्यांना एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

मेडिकल फिजिसिस्ट पदासाठी फिजिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि रेडिओलॉजिकल किंवा मेडिकल फिजिक्समध्ये एम.एससी. डिप्लोमा आणि रेडिएशन थेरपी विभागात कमीत कमी १२ महिने इंटर्नशिपचा अनुभव असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. 

Govt Jobs: भारतीय हवाईदलात २३५ जागांसाठी भरती; लवकर अर्ज करा​

याचबरोबर विज्ञान शाखेतून फिजिक्स विषयात किंवा रेडिओलॉजिकल, मेडिकल फिजिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असेल तसेच रेडिएशन थेरपी विभागात कमीत कमी १२ महिने इंटर्नशिप केली असलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज करू शकतात. 

पब्लिक अभियोक्ता पदासाठी - 
गुन्हेगारी प्रकरणांसंबंधी वकिली केल्याचा ७ वर्षांचा अनुभव असणारे किंवा राज्य न्यायिक सेवा किंवा राज्य आणि केंद्र सरकारच्या कायदा विभागात ७ वर्ष काम केल्याचा अनुभव असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

मुलींसाठी DRDO ने केली Scholarship ची घोषणा; कोण आणि कसे करु शकते अर्ज​

ज्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिग्रीसह एक वर्षाचा अनुभव आहे, ते असिस्टंट इंजिनिअर पदासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी विनंती करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळाची आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top