
UPSC मध्ये लातूरला घवघवीत यश; शुभम भोसले देशात १४९ वा
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (UPSC) निकाल जाहीर झाला असून त्यात लातूर जिल्ह्यातील औसा येथील शुभम संजय भोसले हा विद्यार्थी यशस्वी झाला आहे. त्याने देशातून १४९वा क्रमांक पटकावला आहे. तसेच उदगीर येथील रामेश्वर सब्बनवाड हा विद्यार्थी २०२व्या क्रमांकावर यशस्वी झाला आहे.
हेही वाचा: यूपीएससीत महाराष्ट्रातील उमेदवारांचं घवघवीत यश; पाहा यादी
शुभम हा औसा येथील शिक्षक संजय भोसले यांचा मुलगा आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण औसा येथील श्री मुखतेश्वर विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालयात झाले. शुभमने अभियांत्रिकी शिक्षण मुंबईतून पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच शुभमने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी दिल्लीला जाऊन दोन वर्षे UPSCची तयारी त्याने केली.
हेही वाचा: शेतकऱ्याच्या पोरानं IAS व्हायचं स्वप्न केलं पूर्ण; ओंकारची 'यूपीएससी'त बाजी
शुभमचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला होता; पण त्याने हार न मानता करोनाकाळात रात्रंदिवस अभ्यास केला आणि दुसऱ्या प्रयत्नात यशाचे शिखर गाठले. आई शोभा तर, वडील संजय व बहीण स्नेहा आणि शुभमचा मित्रपरिवार यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. पालकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात आहेत. समाजात परिवर्तन घडवून आणून सर्वासामान्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणार असल्याचे शुभम भोसले याने सांगितले.
हेही वाचा: UPSC 2021 चा निकाल जाहीर, यंदा मुली अव्वल
राज्यातील २९ हून अधिक उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. प्रियंवदा म्हादळकर ही १३वी आली आहे. आदित्य काकडे याने १२९वा, निखिल पाटील याने १३९वा, विनय गडगे याने १५१ वा क्रमांक पटकावला आहे.
Web Title: Upsc Results 2022 Shubham Bhosale From Latur Got 149th Rank And Rameshwar Sabbanwad Ranked 202
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..