शेतकऱ्याच्या पोरानं IAS व्हायचं स्वप्न केलं पूर्ण; ओंकारची 'यूपीएससी'त बाजी

Omkar Madhukar Pawar
Omkar Madhukar Pawaresakal
Summary

UPSC च्या निकालात सातारा जिल्ह्यानं देखील बाजी मारली आहे.

UPSC Result : जावळी तालुक्यातील (Jawali Taluka) सनपाने गावचा सुपुत्र ओंकार मधुकर पवार (Omkar Madhukar Pawar) यानं युपीएससीमध्ये देशात १९४ वा रँक मिळवून आयएएस व्हायचं स्वप्न पूर्ण केलंय. दोन वर्षांपूर्वी ओंकारची यूपीएससीमधून पॅरामिल्ट्री फोर्समध्ये अधिकारी, तर त्यानंतर त्याची आयपीएससाठी देखील निवड झाली होती. परंतु, आयएएस व्हायचं स्वप्न त्याला गप्प बसून देत नव्हतं.

अथक परिश्रम आणि कष्टातून ओंकारनं देशात १९४ वा रँक मिळवला. ओंकारचं प्राथमिक शिक्षण प्राथमिक सनपाने इथं, तर माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल, हुमगांव इथं झालं. त्यानंतर पुणे येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. ओंकारचे वडील हे शेतकरी असून अतिशय कष्ट आणि मेहनतीनं त्यानं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. त्याचं संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

Omkar Madhukar Pawar
UPSC 2021 चा निकाल जाहीर, यंदा मुली अव्वल

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा 2021 चा (UPSC CSE 2021 Result) अंतिम निकाल जाहीर झाला. श्रुती शर्मा (Shruti Sharma UPSC Topper) ही युवती प्रथम आलीय, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर देखील मुलींनीच बाजी मारलीय. अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला या महिला उमेदवारांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलाय. या परीक्षेत एकूण 749 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in इथं निकाल पाहता येईल. उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर 15 दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत.

Omkar Madhukar Pawar
उदयनराजेंचा असाही दिलदारपणा! 'त्या' चिमुरडीकडून पुस्तकं खरेदी केली अन्..

आयोगानं 17 मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती 5 एप्रिल ते 26 मे 2022 या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षेच्या माध्यमातून नागरी सेवेतील 712 पदं भरली जाणार आहेत. दरम्यान, UPSC च्या निकालात सातारा जिल्ह्यानं देखील बाजी मारली असून जावळीच्या ओंकार पवारनं यूपीएससीत देशात 194 वी रॅंक मिळाली असून माण तालुक्यातील अमित लक्ष्मण शिंदे (भांडवली, तेलदरा ता. माण) हे 570 रॅंकनं उत्तीर्ण झाले आहेत.

यूपीएससी : परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिले 10 विद्यार्थी

पहिला क्रमांक : श्रुती शर्मा
दुसरा क्रमांक : अंकिता अग्रवाल
तिसरं क्रमांक : गामिनी सिंगला
चौथा क्रमांक : ऐश्वर्य वर्मा
पाचवा क्रमांक : उत्कर्ष द्विवेदी
सहावा क्रमांक : यक्ष चौधरी
सातवा क्रमांक :सम्यक एस जैन
आठवा क्रमांक : इशिता राठी
नववा क्रमांक : प्रीतम कुमार
दहावा क्रमांक : हरकीरत सिंह रंधावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com