

What Is the OPT Program for International Students?
esakal
US OPT Fee Proposal Explained : अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणानंतर रोजगाराचा मार्ग अधिक खर्चिक होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाकडून ‘ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग’ (OPT) कार्यक्रमाबाबत एका प्रस्तावाचा विचार सुरू असून, त्यात परदेशी विद्यार्थ्यांसाठी सुमारे १ लाख डॉलर म्हणजेच अंदाजे ९६ लाख रुपये शुल्क आकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हे शुल्क सध्या लागू झालेले नाही आणि प्रस्ताव अद्याप प्रक्रियेत आहे.