
काही मुलींच्या बाबतीत जिद्द असूनही शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसते.राज्य,केंद्र सरकार व स्वयंसेवी संस्थांमार्फत मुलींसाठी उपयुक्त योजना पाहणार आहोत.सखोल माहिती शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत
आपण शालेय जीवनापासून ‘ती’चा प्रवास कसा सुरळीत करायचा हे पाहिले. काही मुलींच्या बाबतीत जिद्द असूनही शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसते. आपण राज्य, केंद्र सरकार व स्वयंसेवी संस्थांमार्फत मुलींसाठी उपयुक्त योजना पाहणार आहोत. सखोल माहिती शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना - आर्थिक अडचणींमुळे मुलींचे शिक्षण थांबू नये म्हणून एक ऑगस्ट २०१७पासून महिला आणि बालविकास महाराष्ट्र शासनातर्फे एक मुलगी असल्यास १८ वर्षे कालावधीसाठी ५० हजार रुपये. व दोन मुली असल्यास प्रत्येकी २५,००० रुपये काही अटींवर व पालकांच्या आर्थिक क्षमतेवर ही मदत दिली जाते.
आणखी वाचा : ‘ती’चे: पाया मुलींच्या विकासाचा...
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना - ही योजना महाराष्ट्र राज्यातील १९ जिल्ह्यांत ६ ऑगस्ट २०१८नुसार लागू आहे. मुलींना बालशिक्षणात सक्षम बनविणे हा मुख्य उद्देश आहे व या योजनेतील योग्य मुलींना ‘राष्ट्रीय बालिका’ दिवशी सन्मानित केले जाते.
समाजकल्याण खाते - नेशनवाइड एज्युकेशन स्कॉलरशिप टेस्ट ही दहावी, बारावीसाठी २५ ते ३० हजार रुपयांची शिष्यवृत्ती आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (भारत सरकार) इन्स्पायर स्कॉलरशिप दिली जाते. तसेच, समाजकल्याण खात्यामार्फत अनेक चांगल्या स्कॉलरशिप्स मुलींसाठी उपलब्ध आहेत.
किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीआय) - कर्तृत्ववान व प्रतिभावान विद्यार्थ्यांना विज्ञान व संशोधन क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी ही शिष्यवृत्ती असते. ही अत्यंत मानाची शिष्यवृत्ती आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सी.एस.आय.आर. इनोव्हेशन अवॉर्ड फॉर स्कूल चिल्ड्रेन - अत्यंत बुद्धिमान मुलांसाठी संशोधन क्षेत्राकडे जाण्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे.
या व्यतिरिक्त महिला व बालविकास विभागाच्या योजना आहेत. त्यात नववीपासून मुलींसाठी अनेक शिष्यवृत्त्या आहेत. काही योजनांमध्ये रोजगार व व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. शाळा किंवा कॉलेज करून अर्थार्जनासाठी संधी दिल्या जातात. आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटकातील मुलींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन अर्थार्जनाचे साधन उपलब्ध केले जाते. यात विविध स्वयंरोजगार येतात.
शुभमंगल सामूहिक विवाह योजना व सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या लग्नासाठी आहेत. येथे फक्त योजना दिल्या आहेत. आपण सविस्तर करिअरविषयीच पाहात आहोत. म्हणून फक्त नामोल्लेख केला आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अशा प्रकारे पाचवी स्कॉलरशिप ते पदव्युत्तर शिक्षण घेईपर्यंत मुलींना अनेक शिष्यवृत्ती आहेत. या व्यतिरिक्त स्वयंसेवी संस्था, महापालिकेकडून लाभ मिळतो. काही खास शिष्यवृत्ती व अनुदान क्रीडा विभागाद्वारे दिले जाते. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून ‘क्रीडा प्रबोधिनी’ स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यात निवड झालेल्या विद्यार्थिनींसाठी दरमहा विशिष्ट रक्कम दिली जाते.
अशा प्रकारे दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली मुलगी ‘ध्येयपंथेचि चालती पाऊले’ या उक्तीप्रमाणे आपल्या ध्येयापर्यंत पोचेल, यात शंकाच नाही.