भायखळा प्राणी संग्रहालय : पर्यटकांमुळे BMC ने जमवला २१ लाखांचा गल्ला | Byculla Zoo update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

byculla zoo

भायखळा प्राणी संग्रहालय : पर्यटकांमुळे BMC ने जमवला २१ लाखांचा गल्ला

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : भायखळा येथील प्राणी संग्रहालय (byculla zoo) पर्यटकांसाठी खुले झाल्यापासून पहिल्या 10 दिवसात तब्बल 50 हजारहून अधिक (Above fifty thousand) पर्यटकांनी (tourist visit) भेट दिली आहे. यातून पालिकेच्या तिजोरीत 21 लाखाहून अधिक उत्पन्न (bmc income) जमा झाले आहे. कोविडची पहिली लाट उसळण्यापूर्वीच गेल्या वर्षी मार्च महिन्यात प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.

हेही वाचा: नवी मुंबई : १५ नोव्हेंबरला कोविड योद्ध्यांच्या घरांची सोडत

त्यानंतर तब्बल वर्षभराने 15 फेब्रुवारी 2021 रोजी पुन्हा विरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, काही दिवसात 4 एप्रिलपासून पुन्हा उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी पुन्हा बंद करण्यात आले. कोविड नियंत्रणात आल्यावर दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबरपासून प्राणीसंग्रहालय पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.1 ते 10 नोव्हेंबर या 10 दिवसांत तब्बल 50 हजार 796 पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयला भेट दिली. या 10 दिवसांत मुंबई महापालिकेच्या तिजोरीत पर्यटकांच्या माध्यमातून तब्बल 21 लाख 18 हजार 375 रुपयांचा महसूल जमा झाल्याचे सांगण्यात आले.

loading image
go to top