करिअर वेध : निर्णयक्षमता

करिअर वेधमध्ये निर्णयक्षमतेचे महत्त्व; धोनीच्या ‘आउट ऑफ बॉक्स’ निर्णयापासून खेळ, कॉर्पोरेट व वैयक्तिक आयुष्यात धाडसी, विचारपूर्वक निर्णय घेण्याचे धडे
DecisionMaking

DecisionMaking

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

भारताला २००७ पर्यंत फक्त एकदा विश्‍वकरंडक जिंकता आला होता तोही १९८३मध्ये. त्याच्यानंतर थेट २००७मध्ये आपल्याला फारसा परिचित नसलेल्या टी-२० या फॉरमॅटमध्ये आपण अंतिम फेरीत पोचलो व पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामना खेळलो. धोनीने पहिला चेंडू टाकायला गोलंदाजीत फारस नाव न कमविलेला वीरेंद्र सेहवागला चेंडू दिला. त्याने पहिल्या चेंडूवर यष्टी उडवल्या व भारताला एक शून्याची आघाडी मिळवून दिली. पुढच्या दोन चेंडूंवर उत्तप्पा व हरभजन यांनी यष्टी उडवून भारताला तीन शून्य आघाडी घेतली व आपण २००७चा वर्ल्डकप जिंकला, या ठिकाणी धोनीचा पहिला चेंडू सेहवागला देणे हा निर्णय पूर्णपणे ‘आउट ऑफ बॉक्स’ होता, या एका निर्णयाने आपण वर्ल्ड कप जिंकला व भारताला पुढील अनेक वर्षे धोनीसारखा लीडर मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com