रि-स्किलिंग : शिकण्याची ऊर्मी आणि उपयुक्तता

Learning
Learning

आयुष्याचा चरितार्थ चालवण्यासाठी काहीतरी करावे लागते. काही जण व्यवसाय, काहीजण नोकरी, काहीजण सरकारी आस्थापनांमध्ये मोठ्या हुद्द्याची नोकरीसाठी आपले नशीब आजमावतात. बहुतांश लोक खासगी क्षेत्रात आपले आयुष्य घालवतात. यामधील बहुतांश लोक जे काही करतात त्यामध्ये आनंदी मात्र नसतात. महागडे शुल्क देऊन मोठमोठ्या पदव्या घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. एका सर्वेक्षणानुसार देशातील फक्त १५ टक्के कर्मचारी आपल्या कामाप्रती प्रतिबंध आहे. याचाच अर्थ असा आहे की, ८५ टक्के कर्मचारी आणि कामगार कामाच्या ठिकाणी पूर्णपणे झोकून काम करत नाहीत. बरेचसे कर्मचारी सध्यातरी फक्त पगार मिळतो म्हणून काम करत असे म्हणावे लागेल. शिवाय कोरोनाच्या साथीने असलेली नोकरी टिकवून ठेवणे लोकांना महत्त्वाचे वाटत आहे.

खरंतर आपण एखादी नोकरी करतो आणि त्या नोकरीचा उद्देश फक्त पैसे कमावणे, दर महिन्याला बँकेमध्ये जमा होणाऱ्या पगाराच्या रकमेकडे बघून काम करणे हाच असेल तर अतिशय चिंतेची बाब म्हणावी लागेल.
सरकारी आस्थापनेमधील कर्मचाऱ्यांची परिस्थिती खासगी क्षेत्रापेक्षा जरा वेगळी असते. सरकारी नोकरीमध्ये एक प्रकारची सुरक्षा असते तशी खासगी नोकरीमध्ये नसते. खासगी क्षेत्रामध्ये कमालीची स्पर्धा असते. आणि त्यात टिकून राहण्यासाठी कामगिरी महत्त्वाची ठरते. वेळोवेळी आपली योग्यता सिद्ध करावी लागते.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या सर्व जगामध्ये बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय विघटनकारी परंतु वेगवेगळे बदल घडत आहेत. ऑटोमेशन, डिजिटलायझेशन, सेन्सर टेक्नॉलॉजी, थ्रीडी प्रिंटिंग, त्याचबरोबर व्हर्चुअल रियॅलिटी, अग्युमेंटेड रियॅलिटी यासारखे धोकादायक बदल मानवी आयुष्यावर चांगले अथवा वाईट प्रभाव टाकत आहेत. या सर्व बदलांचा प्रभाव आपल्या नोकरीवर नक्कीच होत आहे. कित्येक जॉब्स या तंत्रज्ञानाच्या सुनामीत धारातीर्थी पडत आहेत. सरकारी नोकरी आणि व्यवसाय थोडा आपण बाजूला ठेवू आणि खासगी क्षेत्रातील नोकरीबद्दल पाच अंगाने विचार करू या. 

मला अनेक जण एक प्रश्न नेहमी विचारतात आणि तो म्हणजे, खासगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांकडून नेमक्या अपेक्षा काय असतात? खूप जणांचे वरिष्ठांशी पटत का नाही? खासगी कंपन्या पुनर्रचनेच्या नावाखाली कोणत्या कर्मचाऱ्यांना नारळ देतात? एका बाजूने कर्मचारी आमच्या ॲसेट आहेत असे सांगणे आणि दुसऱ्या बाजूने व्यवसाय व्यवस्थित होत नसेल तर त्याच कर्मचाऱ्यांना अलगदपणे बाहेर का काढले जाते?

खरंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच शब्दात दडलेली आहेत आणि ती म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांची संभाव्य उपयोगिता आणि त्या कर्मचाऱ्यांची सतत शिकण्याची प्रवृत्ती. कर्मचारी उपयुक्त नसेल, सतत शिकून स्वतःला उपयुक्त करत नसेल तर अशा कर्मचाऱ्यांचा पहिला क्रमांक वरील यादीत लागतो. 

ही संभाव्य उपयोगिता कशी विकसित करावी याबद्दल आपण पुढे बघू.

  • आपण खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल, तर ती टिकवायची कशी?
  • नोकरीचे रूपांतर दिमाखदार कारकिर्दीत कसे करावे?
  • कोणत्या परिस्थितीत नोकरी बदलणे गरजेचे आहे?
  • नोकरी बदलताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा?  
  • संस्था कोणतीही असो कारकीर्द कशी विकसित करावी?

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com