जलसंपदा विभागात एप्रिलमध्ये मेगाभरती! 14 हजार पदांची भरती

जलसंपदा मंत्री पाटील पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यावर मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित आहेत.
Water Resources Minister Jayant Patil
Water Resources Minister Jayant Patilsakal
Updated on
Summary

जलसंपदा मंत्री पाटील पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यावर मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित आहेत.

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी 12 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले नऊ बॅरेजेस निर्माण केले जातील. जलसंपदा विभागातील (Water Resources Department) 14 हजार पदांची लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

Water Resources Minister Jayant Patil
ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका; जयंत पाटील

सोलापुरातील नियोजन भवन येथील जलसंपदा आढावा बैठकीत जलसंपदामंत्री श्री. पाटील हे बोलत होते. यावेळी आमदार समाधान अवताडे, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दीपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे सचिव श्री. राजपूत, जलसंपदाचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ, अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ डी. ए. बागडे, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री पाटील पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यावर मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित आहेत. पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर 9 बॅरेजेस निर्माण केले जाणार आहेत. प्रत्येक बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता ही जवळपास 12 टीएमसी इतकी असणार आहे. त्यामुळे या बॅरेजेसमुळे लाभ क्षेत्रातील शेतजमीन सिंचनाखाली येईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना जलसंपदामंत्री श्री. पाटील म्हणाले, जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंगद्वारे पुढील एक-दोन महिन्यात 14 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल.

Water Resources Minister Jayant Patil
शहाणा पक्ष एका खासदारासाठी नगरसेवक धोक्यात टाकणार नाही; जयंत पाटील

सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या घेण्यात आलेल्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला वेळेत मिळावा, यासाठी जलसंपदा विभाग व महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेनी एकत्रित येऊन शिबिराचे आयोजन करावे व संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करून त्यांना तात्काळ मोबदला देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी श्री. पाटील यांनी दिले. तसेच असे शिबिर लवकर आयोजन करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क ही साधला. जिल्ह्यात जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेली विविध सिंचन प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच प्रस्तावित कामे मंजूर करून तेही वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही पाटील म्हणाले.

दरवर्षी 20 कोटींची थकबाकी

जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून प्रतिवर्षी किमान 30 कोटींची सिंचन पाणीपट्टी मिळणे अपेक्षित असताना फक्त प्रतिवर्षी 10 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून भरले जातात. त्यामुळे प्रतिवर्षी 20 कोटीची थकबाकी राहते. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन पाणीपट्टी भरावी, असे आवाहन जलसंपदा सचिव श्री. राजपूत यांनी केले. मुख्य अभियंता श्री. धुमाळ व अधीक्षक अभियंता श्री. बागडे यांनी ही जलसंपदा विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपसा सिंचन योजनांची माहिती बैठकीत सादर केली.

Water Resources Minister Jayant Patil
जयंत पाटील 'ऑन अॅक्टिव्ह मोड'; सांगलीत बॅंक मतदानाला सुरुवात

वापरेल तेवढ्याच पाण्याचे भरावे लागेल बिल

जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पाचे अपुरे कामे, बॅरेजेस अभावी वाहून जाणारे पाणी अडविणे, शेतकऱ्याकडून संपूर्ण हंगामाची पाणीपट्टीऐवजी वापरेल तेवढे पाण्यावर पाणी पट्टी वसुल करणे, जलसंपदा विभागातील अपुरे मनुष्यबळ व सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ करण्याच्या अनुषंगाने विविध मागण्या करून त्या सोडवण्याबाबत मंत्रीमहोदयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com