जयंत पाटील 'ऑन अॅक्टिव्ह मोड'; सांगलीत बॅंक मतदानाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sagnli

महाआघाडी विरुध्द भाजप अशी लढत होत असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जयंत पाटील 'ऑन अॅक्टिव्ह मोड'; सांगलीत बॅंक मतदानाला सुरुवात

सांगली : जिल्हा बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज जिल्ह्यातील बारा ठिकाणी मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. बॅंकेच्या 21 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या असून 18 जागांसाठी महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत होत आहे. महाआघाडीतील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज प्रक्रिया संस्था गटात मतदान केले. मतदान प्रक्रियेवर त्यांची बारीक नजर आहे. आज सकाळी त्यांनी इस्लामपुरातील केंद्रावर मतदानानंतर गाफील न राहण्याबाबत उमेदवारांना सूचना दिल्या. सकाळच्या दोन तासांत 21 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: तुम्ही PM असाल देशाचे, मी इथला इनचार्ज; युकेच्या सभापतींनी सुनावले

बॅंकेच्या 21 पैकी 18 जागांसाठी सहकार पॅनेलने 18 तर भाजपच्या शेतकरी पॅनेलने 16 उमेदवार रिंगणात उभे केलेत. तसेच 12 अपक्षही रिंगणात आहेत. सोसायटी गटातील काही जागांसह अन्य गटात चुरस निर्माण झाली आहे. क्रॉस व्होटींगचा धोका टाळण्यासाठी उमेदवार दक्ष आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एकुण 2573 मतदार आहेत. प्रत्येक तालुक्यात एक मतदार केंद्र आहे. मिरज आणि वाळवा तालुक्यात मात्र प्रत्येकी दोन मतदान केंद्रे आहेत. महाआघाडी विरुध्द भाजप अशी लढत होत असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रचारात गाफील राहू नका असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे आज मतदानाच्या दिवशीही ते सतर्क झाले आहेत. उमेदवारांना दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. इतरही मतदान केंद्रांना ते भेट देणार असल्याचे समजते. सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ असून बुधवारी (23) मिरजेत शेतकरी भवनमध्ये मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा: 'अमेरिकेत होतं ते महाराष्ट्रात का नाही? CM यांचा कोणावर विश्वास नाहीये का?

loading image
go to top