Devendra Fadnavis : ‘टीईटी’ प्रकरणी चौकशी करू; देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांची घोषणा दोषींवर कडक कारवाई करणार
We will investigate TET case Devendra Fadnavis education scam crime
We will investigate TET case Devendra Fadnavis education scam crime esakal

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारात अपात्र कंपन्यांना पात्र करीत त्यांच्या माध्यमातून कामे करण्यात आली. असे झाले नसते तर हा गैरव्यवहारच घडला नसता.

मंत्रालय स्तरावर हा प्रकार घडला असून अपात्र कंपन्यांना कुणी पात्र करीत गैरव्यवहार केला, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत केली. दरम्यान, यातील दोषींवर कडक कारवाईही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईन्ट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत प्रश्‍न उपस्थित करीत टीईटी गैरव्यवहारात एका मंत्र्याच्या मुलीला नोकरी मिळाली आणि अनेक भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या मंत्र्यांवर काहीच कारवाई करीत नसल्याचा आरोप केला. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत विरोधी सदस्य सभात्याग करीत असल्याची माहिती दिली.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग करताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरील आरोप चुकीचा असून त्यांच्या कोणत्याही मुलीला नोकरी लागली नाही असे स्पष्ट केले. याशिवाय मंत्र्यांवर बेछूट आरोप केल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ असाही पलटवार केला.

जशास तसे उत्तर देऊ : फडणवीस

स्वतःच्याच सरकारच्या काळात झालेल्या गैरव्यवहारावरुन या सरकारमधील मंत्र्यांना राजीनामा मागणारे हे पहिलेच विरोधी पक्ष असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत, मंत्र्यांवर बेछूट आरोप लावल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ असाही पलटवार केला. त्याच्याच काळात झालेल्या गैरव्यवहारांचा आता ‘बॉम्ब’ म्हणून काहीजण उल्लेख करीत असल्याचीही टीका त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com