While eliminating work interruptions
While eliminating work interruptionssakal

कामातील व्यत्यय दूर करताना...

कोणत्याही कामाबाबतची आपली उत्पादकता वाढवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे लक्ष विचलित होऊ न देणे. तसे झाले तरच तुम्ही तुमचा वेळ आणि लक्ष खरोखरच महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित करू शकता.

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

कोणत्याही कामाबाबतची आपली उत्पादकता वाढवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे लक्ष विचलित होऊ न देणे. तसे झाले तरच तुम्ही तुमचा वेळ आणि लक्ष खरोखरच महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित करू शकता. तुम्ही शालेय विद्यार्थी असा किंवा करिअरची जबाबदारी पेलणारे एखादे नोकरदार असा, कामावरचे लक्ष टिकून राहण्यासाठी ते विचलित होऊ न देणे, हे हल्लीच्या काळातील महत्त्वाचे कौशल्य ठरते आहे.

दुर्दैवाने, इतर गोष्टींबरोबरच तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपले लक्ष विचलित होण्याचे प्रमाण वाढले असून, हा प्रश्‍न चिंताजनक पातळी गाठतो आहे. सरासरी ८४.४ टक्के लोकांना लक्ष विचलित होत असल्याने कामात व्यत्यय येण्याची समस्या भेडसावते आहे.

कामात येणारे व्यत्यय किंवा अडथळे दूर कसे करायचे? लक्ष अधिक केंद्रित कसे करायचे? हे जाणून घेण्याआधी आपण हे समजून घ्यायला हवे की, आपला मेंदू लक्ष केंद्रित असण्याचा काळ आणि लक्ष विचलित होण्याचा काळ यामध्ये प्रवास करत असतो. त्यामुळे आपण लक्ष केंद्रित होण्याचा काळ अधिकाधिक वाढवण्यावर भर देऊ शकतो.

मात्र, हे करत असतानाच आपले चित्त विचलित होण्याचा धोका वाढत असतो. हे सर्व समजून घेतले की, आपले रोजचे वेळापत्रक वास्तवाच्या जवळ जाणारे होते. पुढे पुढे या गोष्टीची सवय होते आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. लक्ष केंद्रित करण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स खालीलप्रमाणे-

आणखी ५ मिनिटे

जेव्हाही काम थांबवण्याचा मोह होतो, लक्ष लागत नाही असं वाटतं, तेव्हा स्वतःला ‘आणखी ५ मिनिटे’ असं सांगा. हा वेळ कमी वाटत असला, तरी बऱ्याचदा हा वेळ पुरेसा ठरतो. आणखी ५ मिनिटे ते काम करत राहिल्याने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित होतं आणि पुढे काम करणं सोपं होतं. ५ मिनिटं अधिक धावणं, अभ्यास करणं, वाचन करणं या सवयीने ते काम अधिक वेळ करता येतं.

वेळ ठरवणे

विशिष्ट कामासाठी वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेत तेच काम करा. त्यामुळे आपोआप इतर व्यत्यत कमी होण्यास मदत होते. मुलांच्या अभ्यासासाठी हा काळ सलग २५ मिनिटे असा असू शकतो किंवा मोठ्यांसाठी सलग दोन तास असाही असू शकतो. त्या वेळेत तुम्ही दुसरे कोणतेही काम न करता पूर्ण एकाग्र राहणे आवश्‍यक आहे हे लक्षात ठेवा.

‘ट्रिगर्स’ टाळा

स्मार्ट फोनवर येणारे नोटिफिकेशन्स, विविध ‘अलर्ट’ यांमुळे आपले लक्ष विचलित होण्यात भर पडते. असे सर्व अडथळे म्हणजेच लक्ष विचलित करणारे ‘ट्रिगर्स’ टाळा. यासाठी फोन बंद करा. तुमच्या कामाची वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेत शक्यतो कोणालाही भेटू नका.

वेळ वाया घालवणे

हे लक्षात घ्या की, कामातून विश्रांती घेणे म्हणजे वेळ वाया घालवणे नाही. हा वेळ आनंदाचा, मजेचा, स्वतःसाठी नवी ऊर्जा घेण्याचा, शांततेचा असू शकतो. त्यामुळे आपला वेळ वाया जातो आहे, असा विचार करू नका. काम सांभाळून मजेचा वेळ ठरवा आणि त्यात मनमुराद जगा. त्यामुळे नंतर काम नीटपणे होईल.

१० मिनिटांचा नियम

चित्त विचलित होणं हे केवळ बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतं असं नाही, तर बऱ्याचदा ते मन:स्थितीवरही अवलंबून असतं. त्यात एखाद्या गोष्टीबाबत स्पष्टता नसणे, मन:स्थिती ठीक नसणे अशा गोष्टींचा समावेश असू शकतो. अशा वेळी स्वतःला दोषी न मानता आपल्याला असे का वाटते आहे? याचा शोध घ्या. नेमक्या कोणत्या भावनेने तुमचे चित्त विचलित होते आहे, त्या भावनेचा शोध घ्या. त्या वेळी आपण खूप दमलो आहोत अशी जाणीव झाल्यास स्वतःला १० मिनिटांचा वेळ द्या. शांत राहा. या १० मिनिटांच्या ‘ब्रेक’ने तुम्ही पुन्हा शांतपणे त्या गोष्टीचा विचार करू लागता.

‘स्पेस’ व ‘टाइम’

एखादी जागा आणि वेळ आपल्याला नवा विचार करण्याची प्रेरणा देऊ शकतात. हा वेळ स्वतःसाठी घेतलेला असतो आणि ही जागा कोणतीही असू शकते. ती शक्यतो गर्दीपासून लांब असते. त्यामुळे त्या जागेत गेल्यावर तेथील वातावरणाच्या प्रभावामुळे आपण शांत होतो आणि आपल्याला नवे काही सुचू लागते. आपण पूर्वी वाचलेले चांगले किस्से, प्रेरणादायी ओळी आठवतात. सुप्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन असा स्वतःसाठीचा वेळ काढतात. त्याला ते ‘थिंकिंग वीक्स’ असे म्हणतात. आपणही असे करून पाहू शकतो.

लक्ष केंद्रित करण्यासाठीची आधुनिक तंत्रे आणि प्रात्यक्षिके पाहण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम पेजला किंवा द इंटेलिजन्स प्लस नावाच्या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com