Corona Virus: घरून काम करताना ही घ्यावी काळजी...

work from home
work from home

पुणे : संपूर्ण जगासमोर सध्या कोरोना विषाणूची समस्या निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संकट घोषित केले आहे. त्यामुळे या विषाणूचा धोका असलेल्या देशांनी आपापल्या पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या (Work from home) सूचना दिल्या आहेत.  

गूगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, हिटाची, अॅपल, अॅमेझॉन, शेवरॉन, सेल्सफोर्स आदी ब्रिटन ते अमेरिका, जपान ते दक्षिण कोरियापर्यंत पसरलेल्या या सर्व जागतिक कंपन्या गेल्या काही दिवसांत कोविड -१९ शी लढा देण्यासाठी सहकार्य करत आहेत. याचाच भाग म्हणून या सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना Work from homeची सूचना दिली आहे.

जागतिक आरोग्य संकट
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संकट घोषित केले आहे. अशा प्रकारची, नियंत्रणात न येणारी कोव्हिड-19ची साथ आम्ही याआधी पाहिलेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. संपूर्ण जगात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे चीन, दक्षिण कोरिया आणि इटलीतील आहेत.

जगभरात आतापर्यंत सुमारे चार हजार जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस हे आता विश्वव्यापी संकट झाले आहे. चीनमधल्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसचा प्रसार जानेवारीच्या मध्यात, म्हणजे दीड महिन्यापूर्वी सुरू झाला. कुण्या एका माणसाने तिथल्या बाजारातून एका जंगली प्राण्याचं मांस विकत घेऊन खाल्ले. त्या प्राण्यातून हा रोग माणसांमध्ये आल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना व्हायरस हा एका विषाणुमुळे होतोय. या रोगाला CoVID 19 असे नावही देण्यात आले आहे. याची लक्षणे सुरुवातीला न्युमोनियासारखीच असल्याने या रोगाचा धोका सुरुवातीला लक्षात येत नाही. म्हणजे ताप, खोकला वगैरे. मात्र नंतर पेशंटची परिस्थिती वेगाने खालावते. त्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही आणि जीवही जाऊ शकतो.

कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतपणे ‘साथीचा रोग’जाहीर केले आहे. त्यामुळे आंतरराष्टीय कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पवित्रा घेतला आहे. अशा काळात घरूनच काम केल्यास आरोग्यासाठी अधिक फायद्याचे आहे. 

घरून कसे काम करावे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. घरून काम करताना उत्पादकतेवर परिणाम न होता गतीने काम व्हावे यासाठी काही मार्ग आहेत, ते पुढीलप्रमाणे...

अनेक कर्मचाऱ्यांना अॉफिसच्या वातावरणाची सवय असते. त्यामुळे घरून काम करताना कामात मन लागत नाही. परिणामी कर्मचाऱ्याच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. काही कर्मचाऱ्यांचा घरून काम करण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. त्यामुळे नवीन वातावरणात कसे काम करावे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. घरून काम करताना उत्पादकतेवर परिणाम न होता गतीने काम व्हावे यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी...

- बॉससह कनेक्टेड राहा
घरून काम करताना आपल्या बॉससह फोनवर कनेक्टेड राहा. त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हे विचारून मगच कामाला सुरुवात करा. बहुतेक लोकांना अॉफिसमध्ये त्यांच्या बॉसच्या अवतीभवती घुटमळत राहायची सवय असते. अशा कर्मचाऱ्यांना घरून काम करताना बॉससोबतचा संवाद बिघडून अधिक त्रास होतो. 

- घरून काम करताना वास्तविक नोकरीप्रमाणे वागा
घरात सुसज्ज जागा नसल्यास आपल्या कामासाठी सोईस्कर जागेची रचना करा. सोईस्कर जागा असल्यास काम करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. याचा तुमच्या उत्पादकेवर देखील योग्य परिणाम होईल.

- टेबल खुर्चीवर बसून काम करा
घरात टेबल खुर्ची असल्यास  त्याचा वापर करा. शक्यतो त्यावर बसून काम करा. असे केल्यास तुम्हाला जणू अॉफिमध्ये बसून काम करत असल्यासारखे वाटेल. टेबल-खुर्चीवर बसून काम केल्यास आळस जाणवणार नाही व तुम्हाला थकव्याचा त्रास होणार नाही.

- घरातील सदस्यांना सूचना देऊन ठेवा
घरातील सदस्यांना आपल्या कामाबाबत सूचना देऊन ठेवा. त्यांना सांगा की, जेव्हा खोलीचे दार बंद असेल तेव्हा मी कामात असेल. त्यामुळे मला त्रास होईल असे वागू नका.

कार्यालयीन राजकारण व सहकार्यांचे व्यत्यय
एका सर्वेक्षणानुसार घरून काम करत असताना ईतर सहकार्यांकडून येणारे व्यत्यय कमी असतात. कार्यालयीन राजकारणाचा सामना करावा लागत असल्याने ताण-तणाव कमी येतात. एका सर्वेक्षणानुसार घरी एकटे काम केल्यामुळे कामाच्या प्रेरणेत उत्पादनक्षमतेत घट येते. परंतु या कामाची सवय झालेल्यांसाठीसुद्धा, घराबाहेर काम करणे असंघटित आणि वेगळे वाटू शकते. त्यामुळे समर्पित वर्कस्पेससह घरी काम करणे अधिक सोईचे ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com