esakal | व्यवस्थापन, नॉन-टेक अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये? AICTE प्रमुखांचं सूचक विधान
sakal

बोलून बातमी शोधा

Sahasrabuddhe

केंद्र सरकार आता इतर तांत्रिक अभ्यासक्रम जसे व्यवस्थापन तसेच गैर-तांत्रिक अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये देण्यास उत्सुक आहे.

व्यवस्थापन, नॉन-टेक अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये?

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारतातील काही महाविद्यालयांत प्रादेशिक भाषांमध्ये (Regional languages) अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर, केंद्र सरकार आता इतर तांत्रिक अभ्यासक्रम (Technical course) जसे व्यवस्थापन (Management) तसेच गैर-तांत्रिक (Non-Technical) अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये देण्यास उत्सुक आहे, अशी माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (All India Council for Technical Education) (AICTE) चेअरमन अनिल सहस्रबुद्धे (Anil Sahasrabuddhe) यांनी "द प्रिंट'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.

हेही वाचा: अंतिम वर्षासाठी विद्यार्थ्यांना 'कौशल्य' कोर्स बंधनकारक !

2021-22 शैक्षणिक सत्रापासून एआयसीटीईद्वारे मान्यताप्राप्त देशभरातील 13 महाविद्यालयांमध्ये बंगाली, तमिळ, तेलुगु, मराठी आणि हिंदी या पाच प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रम देणार आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान हे अभ्यासक्रम शिकवले जातील. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाचाही पुरस्कार करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi government) प्राथमिक शालेय स्तरापासून ते विद्यापीठांपर्यंत ही संकल्पना अमलात आणण्यास उत्सुक आहे. एआयसीटीईने त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी करून प्रक्रिया सुरू केली आहे.

श्री. सहस्रबुद्धे म्हणाले, आम्ही गेल्या तीन वर्षांपासून प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रम डिझाईन करण्यावर काम करत आहोत. परंतु जेव्हा एनईपीनेही (NEP) त्याचा पुरस्कार केला, तेव्हा आम्ही प्रादेशिक भाषांमध्ये पूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची व्याप्ती पाहिली आणि केवळ एका विशिष्ट भाषेतील निवडक मॉड्यूलची रचना केली नाही.

भविष्यात, इतर तांत्रिक अभ्यासक्रम जे आमच्याकडे आहेत आणि अगदी गैर-तांत्रिक अभ्यासक्रम देखील प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असतील. सरकार त्या दिशेने काम करत आहे. एक केंद्रीय समिती, ज्यात उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांचा समावेश आहे, त्या दिशेने काम करत आहे, असे श्री. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन (एनबीए) द्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम चालवणाऱ्या, प्रादेशिक भाषेचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता निवडून सरकार शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची खात्री करेल आणि जे विद्यार्थी कोर्समध्ये सामील होऊ इच्छितात त्यांची निवड देखील केली जाईल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे प्रवेश परीक्षेची कठोर प्रक्रिया असणार आहे.

हेही वाचा: बारावी निकाल : सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिला

लोकांनी असे समजू नये, की आम्ही हे कार्यक्रम सादर करण्यासाठी निकृष्ट दर्जाची महाविद्यालये निवडू; कारण ती प्रादेशिक भाषांमध्ये आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी जेईई आणि राज्य निवड परीक्षांच्या नेहमीच्या मार्गाने जावे लागेल, असेही श्री. सहस्रबुद्धे म्हणाले.

संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), जी भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रवेशद्वार आहे, या वर्षीपासून 13 प्रादेशिक भाषांमध्येही घेतली जाईल. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी मातृभाषेत शिक्षण सुलभ होईल. सरकारने या वर्षी चार टप्प्यांमध्ये जेईई मेन्स आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, पहिले तीन टप्पे आधीच संपले आहेत आणि चौथा टप्पा ऑगस्टच्या अखेरीस होण्याची शक्‍यता आहे.

या अभ्यासक्रमांविषयी बोलताना श्री. सहस्रबुद्धे म्हणाले, की कोणत्याही शास्त्रीय शब्दांचे कोणत्याही प्रादेशिक भाषेत भाषांतर केले जाणार नाही. उदाहरणार्थ, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये "resistance' हे "resistance'च राहील आणि इतर कोणत्याही भाषेत अनुवादित केले जाणार नाही. वैज्ञानिक संज्ञा काटेकोरपणे इतर कोणत्याही भाषेत अनुवादित केल्या जाऊ नयेत; कारण त्या वैज्ञानिक संज्ञा आहेत आणि इंग्रजी नाहीत.

हेही वाचा: अडीच कोटींहून जास्त विद्यार्थ्यांकडे नाहीत डिजिटल उपकरणे !

कौन्सिलने पाच भाषांमध्ये अध्यापन साहित्य देखील तयार केले आहे, ज्यामध्ये अभ्यासक्रम दिले जातील. गेल्या वर्षी, परिषदेने सध्याच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी स्वारस्य पातळी जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे केला होता. सर्व्हेमध्ये असे आढळून आले की, अभियांत्रिकीच्या 44 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकवायचे आहे आणि तमिळ भाषा प्राधान्यपूर्ण भाषेच्या यादीत सर्वात वर आहे.

सर्व्हेबद्दल बोलताना सहस्रबुद्धे म्हणाले, सर्व्हेने आम्हाला कल्पना आली की विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकण्याची आवड आहे. प्रत्यक्ष प्रतिसाद मात्र या वर्षी विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतरच कळेल.

आतापर्यंत एआयसीटीईने म्हटले आहे, की तांत्रिक महाविद्यालयांमध्ये नवीन सत्राला ऑक्‍टोबरमध्ये सुरवात होईल.

एआयसीटीईशी संलग्न महाविद्यालयांमधील 83,000 विद्यार्थ्यांमध्ये "मार्तभाषेतील अंडरग्रॅज्युएट इंजिनिअरिंग एज्युकेशन' हो सर्व्हे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात आला होता.

loading image
go to top