esakal | दोन हजार 280 शाळांची आज वाजणार घंटा; प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय I School
sakal

बोलून बातमी शोधा

School

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागातील शाळा आजपासून (सोमवार) सुरू होणार आहेत.

दोन हजार 280 शाळांची आज वाजणार घंटा

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागातील शाळा (School) आजपासून (सोमवार) सुरू होणार आहेत. त्यामुळे, तब्बल दीड वर्षानंतर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) आणि ग्रामस्तरावर कार्यरत ग्रामशिक्षण समितींनी आवश्यक तयारी केली असून, जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या दोन हजार २८० शाळांची घंटा वाजणार आहे.

कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणातून धडे गिरवित आहेत. त्यामुळे, शाळांचे निकालही आधीच्या वर्गातील निकालाद्वारे लावण्यात आले. दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल नववी आणि अकरावीच्या गुणांवर आधारित देण्यात आले. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र, यंदा जानेवारीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता ऑगस्ट महिन्यापासून कोरोना हळूहळू आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार राज्य सरकारने गावपातळीवर सर्वे करून शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: राजकीय वातावरण तापलं! तिकीट मिळवण्यासाठी उमेदवार अजितदादांना भेटणार

दरम्यान, सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या दोन हजार २८० शाळांमध्ये दोन लाख सहा हजार ५३ एवढी संख्‍या आहे. तर शहरी भागातील आठवी ते बारावीच्या १९२ शाळा सुरू होणार असून, त्यामध्ये विद्यार्थीसंख्या ७८ हजार ८०८ आहे. कोरोनाच्या दृष्टीने शाळांमध्ये सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार असून, शिक्षकांच्याही दोन्ही लसीकरणाचे डोस पूर्ण झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

हेही वाचा: वाईत Filmcity उभारणार, साताऱ्याला जगाच्या नकाशावर आणणार : उदयनराजे

शिक्षकांची जबाबदारी

  • विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून आठवडाभर विशेष उपक्रम

  • पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोना भीती घालविण्यासाठी उद्‌बोधन

  • विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करणे

  • विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा आढावा घेऊन अध्ययन करावे

  • सातत्याने विद्यार्थी व पालकांशी संवाद साधण्यावर भर

  • शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शैक्षणिक विषय शिकविणे टाळा

  • सुरक्षेविषयी जनजागृती करणे

हेही वाचा: CIPET मध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीतून होणार निवड

‘‘शाळा सुरू करताना सुरक्षिततेबाबत संपूर्ण काळजी घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. याचबरोबर, शिक्षकांचेही लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच, सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये समन्वय ठेवणार आहे.’’

-प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

loading image
go to top