Pune : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत तरबेज

दूतावासाने घेतली दखल; माणमधील शिक्षकाच्या अभिनव प्रयोगाला यश
zilla parishad students fluent in japanese language teachers efforts education pune
zilla parishad students fluent in japanese language teachers efforts education punesakal

पुणे : मुलांना सतत काहीतरी नवीन शिकविण्याची धडपड करणारा शिक्षक आपल्या मुलांनाही परदेशी भाषा आली पाहिजे, हे ठरवितो. मग तो शिक्षक स्वत: ‘जपानी भाषा’ शिकतो आणि विद्यार्थ्यांनाही ती भाषा शिकवायला लागतो. अवघ्या चार-पाच महिन्यांत शाळेतील विद्यार्थीही त्या भाषेत उत्तम संवाद साधू लागतात. मुलांचा हा संवाद थेट जपान सरकारच्या दूतावासापर्यंत पोचतो आणि त्यांच्याकडून जपानी भाषा शिकण्यासाठी सहकार्य करण्याची इच्छा दर्शविली जाते.

ही कोणत्याही परिकथेतील गोष्ट नव्हे; तर हे प्रत्यक्षात घडले आहे ते कायम दुष्काळी भाग असणाऱ्या माण तालुक्यातील (जि. सातारा) विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेबाबत. या शाळेतील उपशिक्षक बालाजी जाधव यांच्या जपानी भाषेच्या अभिनव प्रयोगामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी भाषा शिकण्याचे दालनं खुले झाले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील ४० विद्यार्थी सध्या जपानी भाषा शिकत आहेत.

पदवी शिक्षणानंतर परदेशात जाऊन नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्नं असते. म्हणूनच शालेय शिक्षण सुरू असतानाच विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकविण्याचा निर्धार जाधव यांनी केला आणि प्राथमिक शाळेतच जपानी भाषेचे धडे देण्यास सुरवात केली. ऑक्टोबरपासून जाधव यांनी स्वत: ही भाषा शिकण्यास सुरवात केली. आता हे विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, गणिते आणि दैनंदिन संवाद साधण्यात तरबेज झाले आहेत.

विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आणि जपानी भाषेत संवाद साधण्याचे कौशल्य पाहून मुंबईतील जपान सरकारच्या दूतावासाने शाळेला ‘जपान फाउंडेशन’शी जोडून देण्याचे ठरविले. याद्वारे विद्यार्थ्यांना जपानी भाषेचे अधिकृत शिक्षण आणि जपानी भाषेच्या परीक्षेसाठी लागणारे साहित्य आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, यासाठी सहकार्य करणार आहे, असे बालाजी जाधव यांनी सांगितले.

जपानी भाषेत तीन प्रकारच्या लिपी असतात. त्यातील ‘हिरागाना’ नावाची लिपी विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती प्रभावी असल्याने ते वेगळी भाषा लवकर शिकू शकतात. अवघ्या दोन महिन्यांत जपानी भाषेतील अक्षरे, अंक, वाचन, लेखन, संवाद साधणे ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली आहेत.

- बालाजी जाधव, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा, विजयनगर (ता. माण, जि. सातारा)

शाळेत असे शिकवितात जपानी

  • सुरवातीला २-३ आठवडे विद्यार्थ्यांना यू-ट्यूबवरील जपानी भाषेचे व्हिडिओ दाखविणे

  • व्हिडिओद्वारे जपानी भाषा ऐकणे

  • मूलभूत गोष्टी समजू लागल्यानंतर जपानी भाषेतून संवाद साधणे

  • जपानी भाषेतील हिरागाना नावाची लिपी शिकविण्यास सुरुवात

  • पाच-पाच अक्षरे शिकवून त्यांचे वाचन व लेखन शिकविले

  • चार ते पाच ओळींचे छोटे संवाद गटागटाने घेतले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com