

thane mahapalika
esakal
Thane Municipal Corporation: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच भाजपने आपल्या मित्रपक्षांना मोठा धक्का दिला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपने जिल्हा निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, यात एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाचे कट्टर विरोधक गणेश नाईक यांना प्रभारी म्हणून नेमले आहे. यामुळे महायुतीत अंतर्गत कलहाची ठिणगी पडली असून, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वादळ उठले आहे. भाजपने शिंदे सेनेला स्वबळावर लढण्याचे आव्हान दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.