
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपचे 29 उमेदवार आघाडीवर आहेत.
Manipur : भाजपाचे 'पुरेपूर मणिपूर'; राज्यात बहुमतासह 'कमळ' फुलणार
Manipur Assembly elections Result 2022 : लोकसभेची (Lok Sabha Election) सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मणिपूरच्या या निवडणुकीत 60 जागांसाठी मतदान झालं असून एकूण दोन टप्प्यांत मतदान पार पडलंय. पहिला टप्पा 28 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 5 मार्च रोजी पार पडला. आज मतमोजणी सुरु आहे. मणिपूरसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल गुरूवारी सकाळपासून हाती येऊ लागले. यात भाजपा बहुमताच्या आकड्याजवळ आहे, तर भाजपाला टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस खूप कमी जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं भाजपाचं 'पुरेपूर मणिपूर' हे स्वप्न पुन्हा सत्यात उतरताना दिसतंय.
मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी पहिला टप्प्यातील मतदान 28 फेब्रुवारी तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 मार्च 2022 रोजी पार पडलं असून, याचा निकाल आज लागला आहे. सध्या विधानसभेत भाजपचे (BJP) 28, काँग्रेस 15, NPP 4, NPF 4, तृणमूल 1 आणि 1 अपक्ष सदस्य आहेत. विधानसभेच्या 7 जागा अजूनही रिक्त आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च 2022 रोजी संपत आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात साधारण 78 टक्के तर, दुसऱ्या टप्प्यात 76.04 टक्के मतदान पार पडलं होतं. मणिपूरमध्ये एनडीएप्रणित भाजपचं सरकार होतं. यंदाही भाजपचंच सरकार मणिपूरमध्ये येत असल्याचं चित्र दिसत आहे.
हेही वाचा: Manipur Election Results Live : मुख्यमंत्री बिरेन सिंह 15 हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेसची पिछाडी कायम
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपचे 29 तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपाचा थेट सामना असलेल्या काँग्रेसला अन्य स्थानिक पक्षांच्या निम्म्या जागाही मिळत नसल्याचं दिसत आहे. अन्य स्थानिक पक्षांमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी, नागा पीपल्स फ्रंटचे आमदार आघाडीवर आहेत.
Web Title: Bjp Is Leading In Manipur Assembly Elections With 29 Candidates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..