
अजित पवारांनी सांगितली नाना काटेंच्या पराभवाची कारणं, म्हणाले...| Chinchwad By-Election
कसब्यात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला, मात्र चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा धक्कादायक पराभव झाला. मविआच्या बंडोखोरीचा फटका नक्कीच नाना काटे यांना बसला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचा पराभव झाला. तर अश्विनी जगताप यांनी बाजी मारली आहे.
दरम्यान या पराभवाचे कारण खुद्द अजित पवार यांनीच दिलं आहे. अजित पवारांनी चिंचवडसाठी मोठी ताकत लावली होती, तरी देखील त्यांची निराशा झाल्याचे दिसत आहे. दरम्यान अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाल की, कसब्याची पुनरावृत्ती चिंचवडमध्ये देखील घडली असती मात्र आम्हाला नाना काटे आणि राहुल कलाटे या दोघांनी तिकीटं मागितली मात्र कोणा तरी एकालाच तिकीट द्यायचं होतं. ते दोघे ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिले.
राहुल कलाटे यांना सांगण्याचा ,समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही. मात्र राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी देखील खुप प्रयत्न झाले विरोधकांनी कलाटे यांना सगळ्या प्रकारे मदत केली.
तरी देखील महाविकास आघाडीने चांगली टफ फाईट देण्याचं काम केलं, चिंचवडमध्ये जर एकच उमेदवार देण्यात आम्ही यशस्वी झालो असतो तर ही देखील जागा आम्ही खेचून आणली असती. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.