

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the media after BJP’s historic victory in municipal elections.
esakal
Devendra Fadnavis’ First Reaction After Municipal Election Victory : राज्यभरातील महापालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले असून, सर्वात जास्त जागा जिंकण्याची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना महायुतीने ठाकरेंना जबरदस्त धक्का देत, मुंबई महापालिकेतही विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानत, पहिली प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘’आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला महाविजय मिळालेला आहे. अनेकप्रकारे सगळे रेकॉर्ड आपण तोडलेले आहेत. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही येते आहे.’’
तसेच ‘’विशेष करून सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या, मुंबई महापालिकेतही जरी आथा मतमोजणीला उशीर होतोय. अजून मतमोजणी बाकी आहे तरी जे काही ट्रेंड्स आहेत. त्याप्रमाणे निश्चित बहुमत महायुतीला या ठिकाणी मिळणार आहे. त्याप्रमाणे मुंबईच्या महापालिकेवरही महायुतीचाच झेंडा फडकेल. याबाबत आमच्या मनात कोणतेही शंका नाही.’’ असंही फडणवीस म्हणाले आहेत.
याशिवाय ‘’आपण या निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेवून गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिला आहे, तोच अजेंडा घेवून आम्ही जनतेत गेलो होतो. या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. याबाबत मनापासून आनंद होतोय.’’ असंही फडणवीसांनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.