Ambadas Danve’s First Reaction After Defeat : ‘’सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही हेच सत्य’’ ; छत्रपती संभाजीनगरातील पराभवानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve Reaction on defeat in Chhatrapati Sambhajinagar :जाणून घ्या, पराभव मान्य करत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आणखी काय म्हटलंय.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve Reaction to media after defeat in the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve Reaction to media after defeat in the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections.

esakal

Updated on

Ambadas Danve reacts to municipal election defeat in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यानंतर एमआयएम आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अनुक्रमे जागा मिळवल्या असून त्यानंतर ठाकरे गटाचा नंबर लागतो आहे. हा निकाल ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. एवढच नाहीतर या निवडणुकीत अंबादास दानवे यांच्या भावाचाही पराभव झाला आहे. या पराभवानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

मीडियाशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ''जनतेने हे कबूल केलं पाहीजे की भाजपने या शहराला पाणी दिलं नाही, नुसत्या घोषणा दिल्या. या शहराला हजारो कोटींच्या कर्जाच्या खाईत लोटलं. तरीही जनतेने भाजपला निवडलं आहे. आम्ही हा आमचा पराभव मान्य करत आहोत.''

तसेच, ''या शहराला नऊ-नऊ दिवसाला पाणी मिळतं. मागील वर्षी ३६५ दिवसांपैकी केवळ ४४ दिवस पाणी मिळालेलं आहे. या शहरात कचऱ्यापासून ते सगळ्या एजन्सी या गुजरातवरून येतात. या सगळ्या गोष्टी असताना जनतेने पुन्हा एकदा भाजप निवडलेली आहे. जनतेला असं वाटतं की नऊ दिवसांऐवजी दहा दिवस झाले तरी काही हरकत पडत नाही. खर्च हजार कोटी असेल तर तो दोन हजार कोटी झाला तरी काही हरकत नाही. जनतेने असा विचार केला असेल तर जनतेला शुभेच्छा आहेत.'' असं यावेळी दानवेंनी म्हटलं.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve Reaction to media after defeat in the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections.
Sanjay Shirsat Family Victory : छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री शिरसाटांची मुलं विजयी; अंबादास दानवेंचा भाऊ पराभूत!

याशिवाय, ''शिवसेना जनतेसाठी काम करणारी संघटना आहे. जनतेला वाऱ्यावर आम्ही मूळीच सोडणार नाही. कारण, शेवटी झालेल्या मतदानाचं मोठं प्रमाण सुद्धा आम्हाला आहे. कारण, सर्वाधिक उमेदवार सुद्धा आमचे होते. परंतु सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही एवढं सत्य आहे.'' असंही दानवेंनी म्हटलंय.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve Reaction to media after defeat in the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections.
AIMIM Wins in Municipal Election: ‘एमआयएम’ची अनेक महापालिकांत जोरदार मुसंडी; छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक जागा जिंकल्या!

याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ''खरंतर हे दुर्दैव आहे आमचंही आणि त्यांचंही. त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात सत्ता, संपत्ती इथे मंत्री पालकमंत्री आमदार असतानाही ते देखील फार पुढे गेले नाहीत. ते देखील ११-१२ पर्यंत पोहचलेले आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com