Maharashtra Municipal Corporation Elections Announced
esakal
Municipal Corporation Elections: राज्याचं लक्ष लागलेल्या मनपा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात आचारसंहिता देखील लागू झाली आहे. निवडणूक आयोगने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १५ जानेवारी रोजी महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.