Jejuri Fire Incident Video
esakal
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विजयानंतर जेजुरीत जल्लोषादरम्यान एक दुर्घटना घडली आहे. यावेळी भंडारा उधळताना आगीचा भडका उडाला आहे. या घटनेत विजयी दोन उमेदवार भाजल्याची माहिती आहे. स्वरूपा खोमणे आणि घाडगे अशी या नगरसेविकांची नावं आहेत. या घटनेचा व्हिडीओदेखील आता समोर आला आहे.