Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

Nitesh Rane major setback in Kankavli : भाजपचा १५ पैकी ८ जागांवर विजयी, तरीही नगराध्यक्षपद नाही; जाणून घ्या, नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या संदेश पारकर यांनी काय दिली प्रतिक्रिया
Sandesh Parkar celebrates victory after winning the Kankavli city president post, marking a significant political setback for Nitesh Rane.

Sandesh Parkar celebrates victory after winning the Kankavli city president post, marking a significant political setback for Nitesh Rane.

esakal

Updated on

Sandesh Parkar Wins in Kankavli Nagar Panchayat Election: कणकवलीमध्ये भाजपचे मंत्री नितेश राणे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. या ठिकाणी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी झाले आहेत. कणकवलीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असं चित्रं होतं. एकप्रकारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची देखील स्थानिक पातळीवर युती पाहायाल मिळाली होती. संदेश पारकर यांची जरी नगराध्यक्ष पदावर वर्णी लागलेली असली, तरी कणकवलीत १५ पैकी आठ जागी भाजपचे उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहे.

नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत विजय झाल्यानंतर शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी मीडियाला प्रतिक्रया देताना म्हटले की, आमच्या शहर विकास आघाडीत सर्व पक्षाचे नेते होते. आमदार निलेश राणे, उदय सामंत, वैभव नाईक, सतीश सावंत, राजन तेली यांच्यासह सगळ्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. म्हणून शहर विकास आघाडी या ठिकाणी जिंकलेली आहे.

मी कणकवलीवासिंयाना शब्द देतो, कणकवलीत कुठंतरी शाश्वत विकास आपण करूया आणि त्याचा शुभारंभ करूया. खरंतर आम्हाला अनेक आमिषं, प्रलोभनं दिली गेली. परंतु आम्ही कणकवीलवासियांच्या सन्मानाची लढाई आम्ही लढलो आणि ही लढाई कणकवलीवासीयांनी जिंकून दाखवलेली आहे. म्हणून माझ्या सर्व कणकवलीवासीयांचा मतदारांचा मी मनापासून आभारी आहे. माझ्या नेते मंडळीचा देखील मला मोठा पाठिंबा मिळाला आहे.

Sandesh Parkar celebrates victory after winning the Kankavli city president post, marking a significant political setback for Nitesh Rane.
Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

उद्धव ठाकरेंनी मला विरोध केला नव्हता, त्यांनी केवळ एवढंच सांगितलं होतं की एक भूमिका कुठंतरी पक्ष म्हणून राहिली पाहीजे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एक कणकवली पॅटर्न उदयास आलेला आहे. हा कणकवली पॅटर्न आम्ही राबवू. कणकवलीकरांच्या स्वाभिमानाची लढाई आम्ही जिंकली आहे. एक भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त कणकवलीचा आम्ही नारा दिला होता, कणकवलीकरांनी या नाऱ्यावर विश्वास दर्शवला. सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली म्हणून यश मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com