Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Vijay Wadettiwar Statement on BJP Victory : जाणून घ्या, खुद्द विजय वडेट्टीवार यांनीच काँग्रेस आणि शिवसेनेबाबत नेमकं काय सांगितलय
Vijay Wadettiwar Statement on BJP Victory

Congress leader Vijay Wadettiwar addressing the media ahead of Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result

esakal

Updated on

Congress Leader Vijay Wadettiwar Accepts BJP’s Lead : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. थोडाचवेळात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. छोट्या गावापासून ते अगदी मुंबईपर्यंत सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार, आपल्याला कोण नगराध्यक्ष लाभणार याची सर्वांना उत्सुकता आहे. तर निकालाआधी राजकीय पक्षांच्या नेते मंडळीच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. काल साम मराठीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप हा नंबर एकचा पक्ष राहणार असल्याचे समोर आलं आहे.

यानंतर आज मतमोजणी सुरू होण्याआधी काँग्रेसचे प्रमुख नेते विजय वडेट्टीवार यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मीडियाशील बोलताना त्यांनी राज्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष राहील, असं सांगितलं आहे. तसेच, त्यांनी यामागची कारणंही यावेळी सांगितली. याचबरोबर त्यांचा पक्ष काँग्रेस आणि महायुतीमधील शिवसेना या पक्षांची स्थिती काय असणाह हे देखील सांगितलं आहे.

Vijay Wadettiwar Statement on BJP Victory
Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या खुलताबादमध्ये काँग्रेसने खातं उघडलं तर फुलंब्रीमध्ये ठाकरे गटाचा विजय

विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘’भाजप एक नंबर राहील. परंतु जनतेच्या आशीर्वादाने व सहकार्याने आणि आम्ही कुठलही बळ नसताना, काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक दोन पर्यंत पोहचेल. जनतेच्या मनात काँग्रेस आहे राहील, हा याचा अर्थ निवडणूक निकालानंतर दिसेल.’’

Vijay Wadettiwar Statement on BJP Victory
Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

तसेच ‘’एक नंबरवर भाजपच राहील, कारण सत्ता आहे, मंत्री आहेत, प्रचंड पैसा आहे. सोबतीला निवडणूक आयोग आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की नंबर एकवर तेच असणार. काँग्रेस दोन आकडी संख्येपर्यंत पोहचेल का? हे मी सांगणार नाही. २४६ नगरपरिषदा आहेत. यामध्ये काँग्रेसचा आकडा राज्यात क्रमांक दोनचा राहील. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतोय आणि तेवढंच सहकार्य जनतेचं होतं, हे देखील दिसलेलं आहे.’’ असंही वडेट्टीवारांनी सांगितलं.

Vijay Wadettiwar Statement on BJP Victory
School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

याशिवाय, ‘’एकनाथ शिंदेची शिवसेना तिसऱ्या क्रमांकवरच राहील. हे निकालानंतर स्पष्टच होईल. त्यामुळे सत्तेतील पक्षाच्या विरुद्ध लढताना. सत्तेच्या विरुद्ध लढताना संपूर्ण संपूर्ण राज्यात आमचे केवळ १६ आमदार आहे. १६ आमदारांच्या बळावर जर आम्ही क्रमांक दोनवर पोहचतो आहोत. तर जनतेच्या मनातील भावनांचा शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या, महिलांच्या, मनातील उद्रेक आहे, असा त्याचा अर्थ निघेल आणि यापासून सत्ताधारी निकालानंतर धडा घेतील, अशी सुद्धा आधीच सूचना मी करतोय.’’ अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com