
Chinchwad: चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीत बंड 'या' नेत्याकडून कलाटेंची मनधरणी सुरू
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे.राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही. ही उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जाहीर केली आहे.
त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मात्र आता राष्ट्रवादीत बंडखोरी होण्याची शक्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे हे बंडखोरीच्या तयारीत आहेत.
यामुळे कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके गेले आहेत. जर पक्षात बंडखोरी झाली तर मविआ तसेच राष्ट्रवादीला याचा मोठा फटका बसू शकतो.
एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. सोबत विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील उपस्थित आहेत मात्र दुसरीकडे राहुल कलाटे यांची नाराजकी दूर करण्यासाठी आमदार सुनील शेळके प्रयत्न करत आहेत.
जर पक्षात बंडखोरी झाली तर भाजपची विजय जवाळपास निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ही बंडखोरी थोपवण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरते का हे पहावं लागेल.