
राष्ट्रवादी कॉंग्रेसने नव्या सरकारमध्ये 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमान मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळणार असून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांची माहिती आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळात पडणार याची चर्चा सुरु आहे, आज अमित शहा यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होणार आहे. मात्र महायुतीत मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची उत्सुकता असली तर मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत कोणता फाॅर्म्युला असणार आहे, अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.